Join us

पायल घोषला फेव्हरेट शाहरूख खान सोडून रणबीर कपूरसोबत करायचे काम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 22:15 IST

पायलचा फेव्हरेट अभिनेता शाहरूख खान आहे. परंतु तिला शाहरूखसोबत नव्हे तर रणबीर कपूरसोबत काम करायचे आहे, असे तिनेच एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे.

‘पटेल की पंजाबी शादी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणारी अभिनेत्री पायल घोषने सध्या एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. होय, २३ वर्षीय पायल सहा साउथ चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर बॉलिवूडमध्ये नशीब आजमावत आहे. ‘पटेल की पंजाबी शादी’ या चित्रपटात ती परेश रावल, ऋषी कपूर, वीर दास यांच्यासोबत काम करीत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या ती व्यस्त असून, एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत तिने भलतीच इच्छा व्यक्त केली आहे. होय, बॉलिवूड लाइफला दिलेल्या मुलाखतीत पायलला, तुझा फेव्हरेट हीरो कोण? तसेच तुला कोणासोबत काम करायला आवडेल? असे विचारण्यात आले. त्याचे उत्तर देताना तिने क्षणातच शाहरूख खान हे नाव घेतले. परंतु मला शाहरूखसोबत नव्हे तर रणबीर कपूरसोबत काम करायला आवडेल, असेही तिने म्हटले. पायलच्या या वक्तव्यात बराचसा गोंधळ असल्याचे दिसून येते. कारण बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याच्यासोबत काम करण्यास इंडस्ट्रीतील प्रत्येक अभिनेत्री एका पायावर तयार असते. परंतु पायलला शाहरूखसोबत नव्हे तर रणबीर कपूरसोबत काम करण्याची इच्छा आहे. पायलचे हे वक्तव्य शाहरूख खानचा सुरू असलेला बॅडपॅच तर अधोरेखित करीत नाही ना? असो, पायलच्या या पहिल्या-वहिल्या चित्रपटाविषयी सांगायचे झाल्यास, दोन समुदायांमध्ये होत असलेल्या लग्नावर आधारित आहे. एक गुजराथी आणि एक पंजाबी परिवार आणि त्यांच्या मुलाची प्रेमकथा अशीच काहीशी चित्रपटाची कथा आहे. चित्रपटात हसमुख पटेलच्या भूमिकेत परेश रावल असून, गुग्गी टंडनच्या भूमिकेत ऋषी कपूर बघावयास मिळणार आहेत. पायलने चित्रपटात गुजराथी मुलीची भूमिका साकारली आहे. चित्रपट लवकरच रिलीज होणार असून, पायलची एंट्री धमाकेदार होईल काय? हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.