Join us

अभिनेत्री पत्रलेखा मिळाले असे अनोखे सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 21:00 IST

पत्रलेखा लवकरच दाक्षिणात्य सिनेमात पदार्पण करतेय. हंसल मेहता दिग्दर्शित 'सिटीलाईट्स'मधून २०१४ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती आता साऊथमध्ये डेब्यू करणार आहे. 

ठळक मुद्देपत्रलेखा पॉल 'व्हेअर इज माय कन्नडका' या कानडी सिनेमात झळकणार आहेएप्रिल महिन्यात या सिनेमाचे शूटिंग सुरु होणार आहे

पत्रलेखा लवकरच दाक्षिणात्य सिनेमात पदार्पण करतेय. हंसल मेहता दिग्दर्शित 'सिटीलाईट्स'मधून २०१४ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती आता साऊथमध्ये डेब्यू करणार आहे. 

नुकतेच तिने एका सामाजिक संस्थेला भेट देऊन तिथल्या मुलांशी संवाद साधला. इथल्या एका मुलाने पत्रलेखाला सरप्राईज दिले. हे सरप्राईज म्हणजे पत्रलेखा आणि राजकुमार राव यांचे त्याने स्वतःच्या हाताने बनवलेले एक सुंदर चित्र आहे. चाहत्याने दिलेली ही भेटवस्तू बघून पत्रलेखा खूप भारावून गेली. 'हा खरोखरच समाधानकारक असा अनुभव होता. भेट म्हणून स्केच देणाऱ्या या मुलाचे ही  मी मनापासून आभार मानते. त्याने काढलेले हे चित्र मी स्वतःजवळ कायम जपून ठेवेन' असे पत्रलेखा सांगते.

पत्रलेखा पॉल 'व्हेअर इज माय कन्नडका' या कानडी सिनेमात झळकणार आहे. हा अॅक्शन कॉमेडी चित्रपट असून यात ती लोकप्रिय अभिनेता गणेशसोबत दिसणार आहे. एप्रिल महिन्यात या सिनेमाचे शूटिंग सुरु होणार असून बहुतांश सीन्स हे लंडनमध्ये शूट होणार आहेत. 'व्हेअर इज माय कन्नडका' चित्रपटाची कथा, पटकथा, स्टारकास्ट आणि प्री-प्रोडक्शन असे सगळे काही जुळून आले असून यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात युनायटेड किंगडममध्ये संपूर्णतः शूट होणार आहे. या वर्षाअखेरीस सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी निर्माते प्रयत्नशील असतील. कन्नड आणि हिंदीमधील अनेक टेलिव्हिजन शोजचे दिग्दर्शन केलेल्या राज आणि दामिनी ही नवरा बायकोची जोडी पत्रलेखाच्या या आगामी सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. 

टॅग्स :पत्रलेखाराजकुमार राव