कार्तिक आर्यन, अनन्या पांडे व भूमी पेडणेकर लवकरच ‘पती, पत्नी और वो’च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. कार्तिक व अनन्या या चित्रपटात पती-पत्नीच्या भूमिकेत असतील तर भूमी ‘वो’च्या भूमिकेत दिसेल. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आणि प्रेक्षक चित्रपटाच्या प्रेमात पडले. आता या चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. होय, या बातमीनुसार, आता हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी नाही तर याच वर्षी ६ डिसेंबरला प्रदर्शित होईल. याचा अर्थ नियोजित रिलीज डेटच्या महिनाभरआधीच प्रेक्षक या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतील.
‘पती, पत्नी और वो’च्या चाहत्यांसाठी खुशखबर, महिनाभरापूर्वीच रिलीज होणार चित्रपट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 14:37 IST
कार्तिक आर्यन, अनन्या पांडे व भूमी पेडणेकर लवकरच ‘पती, पत्नी और वो’च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. आता या चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे.
‘पती, पत्नी और वो’च्या चाहत्यांसाठी खुशखबर, महिनाभरापूर्वीच रिलीज होणार चित्रपट!!
ठळक मुद्दे१९७८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पती पत्नी और वो’ या सिनेमात संजीव कुमार, विद्या सिन्हा आणि रंजीता कौर यांनी काम केले होते. राज चोप्रा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.