Join us

पनवेल फार्महाऊसवर ‘सुल्तान’ ची सक्सेस पार्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 10:17 IST

 बॉक्स आॅफीसवर सध्या ‘सुल्तान’ ची धूम सुरू आहे. ‘सुल्तान’ हा चौथा सर्वांत जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. चित्रपटगृहांच्या ...

 बॉक्स आॅफीसवर सध्या ‘सुल्तान’ ची धूम सुरू आहे. ‘सुल्तान’ हा चौथा सर्वांत जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. चित्रपटगृहांच्या तिकिटखिडक्यांवर तुफान गर्दी पहावयास मिळत आहे. त्यामुळे ‘सुल्तान’ च्या यशानिमित्त सलमानने पार्टी करायचे ठरवले. आणि तेही त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर.त्यावेळी तिथे दिग्दर्शक अली अब्बास जफर आणि अनुष्का शर्मा हे देखील होते. संपूर्ण वेळ तिघेही अत्यंत चांगल्या मुडमध्ये होते. बॉक्स आॅफीसवर ‘सुल्तान’ ज्याप्रमाणे स्वत:चे अधिराज्य सिद्ध करतोय त्यावरून तर तो आणखी काही रेकॉर्ड ब्रेक करेल असे वाटते आहे.