पॅरिसच्या नृत्यसोहळ्य़ात सहभागी होणार नव्या नवेली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:30 IST
अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली (मुलगी श्वेता नंदाची मुलगी) पॅरिस येथे होणार्या उच्चभ्रूंच्या बॉल डान्ससाठी उपस्थित राहणार आहे. ...
पॅरिसच्या नृत्यसोहळ्य़ात सहभागी होणार नव्या नवेली
अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली (मुलगी श्वेता नंदाची मुलगी) पॅरिस येथे होणार्या उच्चभ्रूंच्या बॉल डान्ससाठी उपस्थित राहणार आहे. जगभरातील २४ मुली या 'डेब्युटंट्स ले बॉल' या नृत्य सोहळ्य़ात सहभागी होणार आहेत. नव्या नवेलीनं सांगितले, की यापूर्वी मी अशा सोहळ्य़ात सहभागी झाली नव्हते. त्यामुळे मी त्यात सहभागी होण्यास उत्सुक आहे. या सोहळ्य़ात माझं नृत्य चांगलं व्हावं, यासाठी पुरेसा सराव करणार असल्याचेही तिनं सांगितले. यासाठी सुयोग्य वेशभूषा ती करणार आहे. उंच टाचांच्या सँडल्सवर चालण्याची सवय नसल्याने तसा सरावही ती करत आहे. ती आणि तिची आई श्वेता नंदाचा मुक्काम असलेल्या पॅरिस येथील हॉटेलमध्ये खास पर्शियन मेकअपमन येणार आहे व नव्या नवेलीचा मेकअप करून तिला या सोहळ्य़ासाठी तयार करणार आहे.