Join us

अन् नाश्ताच्या टेबलवर परिणीतीने घेतला होता राघव चड्ढाशी लग्न करण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 13:42 IST

परिणीती आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा दोघे पंजाब येथे भेटले आणि दोघांमधील प्रेम बहरले.

कलाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. आता अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) देखील लवकरचं विवाह बंधनात अडकणार आहे. परिणीती चोप्राने १३ मे रोजी आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्यासोबत साखपुडा केला आहे.  राघव - परिणीती यांचा साखरपुडा शाही थाटात पार पडला. सोशल मीडियावर त्यांच्या फोटोंचा चांगलाच बोलबाला आहे.

आता परिणीतीने राघवची निवड आयुष्यभराचा जोडीदार म्हणून का केली यावर भाष्य केलं आहे. परिणीती चोप्राने राघव चढ्ढाला तिचा जीवनसाथी म्हणून अतिशय इंटरेस्टिंग पद्धतीने केली आहे. परिणीतीने खुलासा केला की जेव्हा अभिनेत्रीने आप नेत्यासोबत नाश्ता करताना तिला कळलं की हीच व्यक्ती आहे ज्याच्याशी आपल्याला लग्न करायचं आहे. त्यामुळे त्याचं आयुष्य आनंदी होईल.

दरम्यान परिणीती चोप्राने तिचे आणि राघव चढ्ढा यांच्या एंगेजमेंटचे फोटोही शेअर केले आहेत. अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिची बहीण प्रियांका चोप्रासोबत कुटुंबातील इतर सदस्यही दिसत आहेत. परिणीती चोप्राच्या एंगेजमेंटचा तिच्या कुटुंबीयांनी आणि मित्रमंडळींनी एन्जॉय केल्याचे याफोटोंवरुन अधोरेखित होते. 

परिणीती राघव यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगायचं तर, परिणीती आणि राघव यांचं एकाच कॉलेजमध्ये शिक्षण झाले असले तरी, दोघांच्या प्रेमाची सुरुवात मात्र नुकताच झाली आहे. दोघे पंजाब येथे भेटले आणि दोघांमधील प्रेम बहरले. परिणीती तेव्हा पंजाब येथे सिनेमाचे शुटिंग करत होती. तेव्हाच दोघांची भेट झाली आणि भेटीचं रुपांतर प्रेमात झाले असे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :परिणीती चोप्रासेलिब्रिटी