दिग्दर्शक एस. एस. राजमौली साऊथ इंडस्ट्रीतील एक बडे नाव आहे. ‘बाहुबली’ सीरिजनंतर तर राजमौलींची ख्याती जगभर पसरली. ‘बाहुबली’ व ‘बाहुबली 2’ या चित्रपटांनी छप्परफाड कमाई केली. ‘बाहुबली’ व ‘बाहुबली 2’नंतर यावर्षांत राजमौलींचा ‘आरआरआर’ हा सिनेमा रिलीज होतोय. तेलगू सिनेमाचे दोन मोठे सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यात लीड रोलमध्ये आहेत. पण या चित्रपटाची हिरोईन कोण असणार, हे मात्र गुलदस्त्यात होते. पण आता त्याचाही खुलासा झालाय. ताजी चर्चा खरी मानाल तर या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राची वर्णी लागली आहे.
परिणीती चोप्राला राजमौलींच्या चित्रपटाची लॉटरी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 15:24 IST
‘बाहुबली’ व ‘बाहुबली 2’नंतर यावर्षांत राजमौलींचा ‘आरआरआर’ हा सिनेमा रिलीज होतोय. तेलगू सिनेमाचे दोन मोठे सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यात लीड रोलमध्ये आहेत. पण या चित्रपटाची हिरोईन कोण असणार, हे मात्र गुलदस्त्यात होते. पण आता त्याचाही खुलासा झालाय.
परिणीती चोप्राला राजमौलींच्या चित्रपटाची लॉटरी!!
ठळक मुद्देपरिणीतीला याआधीही साऊथचा एक सिनेमा ऑफर झाला होता. ही ऑफर तिने स्वीकारली असती तर ती महेशबाबूच्या अपोझिट ‘स्पाईडर’मध्ये दिसली असती.