Join us

बी-टाऊनच्या या अभिनेत्याला परिणीतीला करायचंय किडनॅप, त्याच्या पत्नीला आहे याची कल्पना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 15:42 IST

परिणीती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रा जबरिया जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोघे या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये आल्या होत्या.

परिणीती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रा जबरिया जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोघे या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये आल्या होत्या. त्यावेळी दोन्ही स्टार्सनी सेटवर खूप मस्ती केली. यावेळी परिणीती चोप्राने एक धक्कादायक खुलास केला. ती म्हणाली तिला, सैफ अली खानला किडनॅप करायचे आहे.  

कपिल शर्माने तिला मस्करीत प्रश्न विचारला की परिणीतीला जर संधी मिळाली तर ती बॉलिवूडच्या कोणत्या स्टारसोबत जबरिया जोडी बनवेल?, यावर परिणिती म्हणाली, मला जर अशी संधी मिळाली तर मी सैफ अली खानला किडनॅप करेन आणि त्याच्यासोबत जबरिया जोडी बनवेन. 

परिणिती पुढे म्हणाली, मला तो नेहमीच आवडतो. मी हे करिनाला सांगितले आहे. करिनाला सुद्धा ही गोष्ट माहिती आहे. 'जबरिया जोडी' चित्रपट जबरदस्तीने होणाऱ्या लग्नावर आधारीत आहे. हा सिनेमा बिहारमध्ये सध्या चालत असलेल्या बळजबरी विवाह करून देण्याच्या म्हणजेच 'पकडूआ शादी' ह्या प्रथेवर आधारित आहे. ह्या सिनेमासाठी एकताने सिद्धार्थला बॉडी बनवण्याचा सल्ला दिला आहे. या भूमिकेसाठी परिणीतीच्या आधी श्रद्धा कपूरला अप्रोच करण्यात आले होते. मात्र तिने नकार दिला. 2 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

टॅग्स :परिणीती चोप्रासिद्धार्थ मल्होत्रा