Join us

परिणिती चोपडाने केला खुलासा, अजय देवगण चेहºयावरून जेवढा भोळा दिसतो तेवढा नक्कीच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 17:07 IST

गोलमाल सिरीजचा आगामी ‘गोलमाल अगेन’ २० आॅक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटात अभिनेता अजय देवगण, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, ...

गोलमाल सिरीजचा आगामी ‘गोलमाल अगेन’ २० आॅक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटात अभिनेता अजय देवगण, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, कुणाल खेमू, नील नितीन मुकेश, परिणिती चोपडा, तब्बू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा एक हॉरर कॉमेडीपट असून, त्याच्या ट्रेलरने सध्या सगळीकडे धूम उडवून दिली आहे. असो, या चित्रपटानिमित्त अभिनेत्री परिणिती चोपडा हिने सुपरस्टार अजय देवगणची पोलखोल केली आहे. तिच्या मते अजय देवगण चेहºयावरून जेवढा भोळा दिसतो तेवढा नक्कीच नाही. एका वेबसाइटला मुलाखत देताना परिणितीने हा खुलासा केला आहे. तिने म्हटले की, शूटिंगदरम्यान मला अजय माझ्या आजूबाजूला जरी बघावयास मिळाला तरी मी अलर्ट होत असे. एकदा मला एक सीन करण्यासाठी दिला, जो खूपच विचित्र होता. मी सीन करताना विचार करीत होती की, यार हा कसा सीन आहे? त्यानंतर मला कळून चुकले की, माझी खिल्ली उडविण्याचा हा सीनमधून प्रयत्न केला जात आहे. त्यावेळी मला टारगेट केले जात होते. वास्तविक चित्रपटात अशाप्रकारचा कोणताच सीन नव्हता. हा सीन केवळ मला वेड्यात काढण्यासाठी स्क्रीप्टमध्ये लिहिण्यात आला होता. विशेष म्हणजे ही बाब सर्व अ‍ॅक्टर्स आणि क्रू मेंबर्सला माहिती होती. केवळ मलाच हे माहिती नव्हते की, माझी खिल्ली उडविली जात आहे. जेव्हा मी हा सीन करीत होती, तेव्हा माझे डायलॉग ऐकूण सर्व जोरजोरात हसत होते. मी वेड्यासारखी गंभीरपणे सीन करण्याचा प्रयत्न करीत होती. जेव्हा मला कुळून चुकले की, हे सर्व केवळ मला वेड्यात काढण्यासाठी केले जात आहे, तेव्हा मी लगेचच सेटवरून खाली उतरले. त्याहीपेक्षा मला हे कळून चुकले की, हा सर्व प्लॅन अजयने केला होता. खरं तर अजय चेहºयावर जेवढा भोळा दिसतो तेवढा नक्कीच नाही, हे मला त्यावेळी कळून चुकले. दरम्यान, या चित्रपटात अजयची अभिनेत्री म्हणून परिणिती काम करीत आहे.