Join us

Parineeti-Raghav Wedding : आदित्य ठाकरेंनीही लावलेली परिणीती-राघव यांच्या शाही विवाहसोहळ्याला हजेरी, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 18:29 IST

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाला शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनीही हजेरी लावली होती.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू होती. अखेर रविवारी(२४ सप्टेंबर) परिणीती आणि आप खासदार राघव चड्ढा यांनी लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली. परिणीती आणि राघव यांनी कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत उदयपूरमधील लीला पॅलेसमध्ये लग्नगाठ बांधली. 

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाला शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनीही हजेरी लावली होती. परिणीती-राघव यांच्या लग्नानंतर उदयपूरहून परतताना आदित्य ठाकरेंना स्पॉट करण्यात आलं. यावेळी पापाराझींनी आदित्य ठाकरेंना परिणीती आणि राघव यांचं लग्न कसं होतं? असा प्रश्न विचारला. यावर त्यांनी हसून "मस्त होतं", असं उत्तर दिलं. 

दरम्यान, परिणीती आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नातील त्यांच्या साध्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी परिणीती आणि राघव यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबई आणि दिल्ली येथे परिणीती आणि राघव यांचं वेडिंग रिसेप्शन असणार आहे.                     

टॅग्स :परिणीती चोप्रासेलिब्रिटीआदित्य ठाकरे