Join us

Video : काळे मणी, डायमंड अन्...; परिणीती चोप्राने कॅमेऱ्यासमोर फ्लाँट केलं मंगळसूत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 18:50 IST

परिणीतीच्या हटके मंगळसूत्राने वेधलं लक्ष, सोशल मीडियावर चर्चा

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चा सुरू होती. रविवारी(२४ सप्टेंबर) परिणीती आणि आप खासदार राघव चड्ढा कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत लग्नाच्या बेडीत अडकले. उदयपूर येथे त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला.त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

लग्नानंतर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. वेडिंग रिसेप्शनसाठी परिणीती आणि राघव उदयपूरहून दिल्लीला आले.  परिणीती आणि राघव या नवविवाहित जोडप्याला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. यावेळी परिणीतीने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. लग्नानंतरही परिणीती अगदी साध्या लूकमध्ये दिसून आली. 

नववधू परिणीती कॅमेऱ्यासमोर तिचं मंगळसूत्र फ्लाँट करताना दिसली. परिणीतीच्या मंगळसुत्राने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. काळे मणी आणि डायमंड असलेलं अगदी साध्या डिझाइनचं मंगळसूत्राने परिणीतीचं सौंदर्य. आणखीनच खुलून आलं होतं. यावेळी तिने केसांत कुंकू लावल्याचंही दिसलं. 

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी मे महिन्यात साखरपुडा केला होता. त्यांच्या लग्नासाठी चाहतेही उत्सुक होते. लग्नानंतर परिणीती आणि राघव यांना चाहते आणि सेलिब्रिटींनी नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

टॅग्स :परिणीती चोप्रासेलिब्रिटी