Join us
Daily Top 2Weekly Top 5

परिणीती चोप्राने गुपचूप उरकला रोका; अभिनेत्री राघव चड्ढांसोबत घेणार सात फेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 19:14 IST

रोका सेरेमनी झाल्या दिवसापासून दोघेही खूप खुश दिसत आहेत.

बी-टाऊनची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra)  गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे.  परिणीती आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत नात्यात असल्याची चर्चा आहे.  इतकंच नाही तर दोघंही लग्न करणार असल्याचंही कानावर येतंय. अद्याप परिणीती वा राघव चड्ढा यावर काहीही बोललेले नाहीत. पण अशात परिणीतीचा राघव चड्ढांसोबत रोका झाल्याची चर्चा आहे. 

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, परिणीती चोप्रा आणि आप खासदार राघव चढ्ढा यांनी गुपचूपपणे रोका सेरमनी उरकून घेतली आहे. दोन्ही कुटुंबातील खास सदस्यांच्या उपस्थितीत परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा रोका झाल्याची  माहिती समोर आली आहे. त्या दिवशी दोघेही खूप खुश दिसत होते. मात्र, परिणीती आणि राघव यांना लग्नाची घाई नाही.

दोघेही सध्या आपापल्या कामात व्यस्त आहेत. पण 4 महिन्यांनंतर म्हणजेच ऑक्टोबरमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा लग्नाच्या सात फेरे घेताना दिसू शकतात. मात्र, याबाबत कोणतीच अधिकृत माहिती मिळालेली नाही.  परिणीती व राघव चड्ढा अद्याप तरी रिलेशनशिपच्या चर्चांवर काहीही बोललेले नाहीत. पण अनेकांनी या नात्यावर शिक्कामोर्तब मात्र केलंय. काही दिवसांआधीच आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांनी ट्वीट करत परिणीत व राघव चड्ढा दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यानंतर आता प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता हार्डी संधूनेही (Harrdy Sandhu) दोघांना शुभेच्छा देत, दोघांचं नातं कन्फर्म केलं होतं.  

परिणीती चोप्रा पहिल्यांदा मुंबईत राघव चड्ढांसोबत स्पॉट झाली होती. दोघेही एकत्र डिनर डेट एन्जॉय करताना दिसले होते. तेव्हापासून दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या चर्चेत आहेत.

टॅग्स :परिणीती चोप्राआप