Join us

अखेर परिणीती चोप्रा-राघव चड्ढा या आठवड्यात उरकणार साखरपुडा? जय्यत तयारी सुरू, प्रियंकाही लावणार हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 18:24 IST

परिणीती आणि राघव एप्रिलमध्येच एंगेजमेंट करणार आहेत. हा एंगेजमेंट सोहळा अतिशय खाजगी असणार आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये कशाची चर्चा सुरू आहे, तर परिणीती चोप्राची. होय, परिणीती आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांना डेट करत असल्याची चर्चा जोरात आहे. आता तर दोघंही लवकरच लग्न करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. लवकरच दोघांचा रोका होणार असल्याचा दावाही केला जात आहे. परिणीती व राघव चड्ढा मात्र अद्याप तरी यावर काहीही बोलायला तयार नाहीत. पण अनेकांनी या नात्यावर शिक्कामोर्तब मात्र केलंय. दोघेही लवकरच एंगेजमेंट करणार आहेत आणि एंगेजमेंटचा हा कार्यक्रम देशाची राजधानी दिल्लीतच होणार आहे.

जेव्हापासून पापाराझींनी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांना एकत्र पाहिले तेव्हापासून या दोघांच्याही चर्चा रंगल्या आहेत. पहिल्यांदा एकत्र डिनरवर, नंतर लंचवर आणि त्यानंतर या भेटीच्या काही दिवसांतच अभिनेत्री फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी गेली. तेव्हापासून ते दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत आणि लग्न करण्याचा विचार करत असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. या महिन्यात दोघेही एंगेजमेंट करणार असल्याचे बोलले जात असून या खास सोहळ्यासाठी अभिनेत्री दिल्लीला पोहोचली आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, परिणीती आणि राघव एप्रिलमध्येच एंगेजमेंट करणार आहेत. हा एंगेजमेंट सोहळा अतिशय खाजगी असणार आहे. मात्र, परिणीती आणि राघव यांनी अद्याप या वृत्तांवर अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाही.

असे बोलले जात आहे की साखरपुड्याच्या कार्यक्रम अतिशय खाजगी असणार आहे, ज्यामध्ये फक्त दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि त्यांचे काही जवळचे मित्र सहभागी होणार आहेत. परिणीतीची बहीण प्रियंका तिच्या कुटुंबासह भारतात आली असल्याने यावेळी एंगेजमेंट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तिची चुलत बहीण मीरा कपूरही दिल्लीत पोहोचली आहे. परिणीती आणि राघव हे लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स येथे एकत्रच शिकले आहेत. 

टॅग्स :परिणीती चोप्रासेलिब्रिटी