बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Pariniti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्डा (Raghav Chadda) यांचा १३ मे रोजी साखरपुडा पार पडला. दिल्लीतील कपूरथाला हाऊस याठिकाणी हा सोहळा थाटामाटात साजरा झाला. यावेळी अनेक नेते मंडळी आणि कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या एंट्रीने सर्वांचंच लक्ष वेधलं. यादरम्यानचे परिणीती आणि राघव यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
एंगेजमेंटनंतर तीन दिवसांनी परिणीती दिल्ली सोडून मुंबईला रवाना झाली आहे. ज्याची माहिती खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना दिली. परिणीती चोप्राने काही तासांपूर्वी दिल्लीला बाय बाय म्हटलं आहे.दिल्लीला निरोप देण्यापूर्वी परीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शहराचा एक फोटो देखील शेअर केला आहे. ज्यावर तिने लिहिले - बाय बाय दिल्ली... माझे हृदय मागे सोडून... परीचे हे कॅप्शन पाहून असे स्पष्टपणे म्हणता येईल की ती तिच्या होणाऱ्या पती राघवला खूप मिस करणार आहे.
परिणीती राघव यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगायचं तर, परिणीती आणि राघव यांचं एकाच कॉलेजमध्ये शिक्षण झाले असले तरी, दोघांच्या प्रेमाची सुरुवात मात्र नुकताच झाली आहे. दोघे पंजाब येथे भेटले आणि दोघांमधील प्रेम बहरले. परिणीती तेव्हा पंजाब येथे सिनेमाचे शुटिंग करत होती. तेव्हाच दोघांची भेट झाली आणि भेटीचं रुपांतर प्रेमात झाले असे सांगण्यात येत आहे.