Join us

परिणीती चोप्राने राघव चड्ढा यांना दिलं स्पेशल गिफ्ट, लग्नासाठी रेकॉर्ड केलं खास गाणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 17:45 IST

Parineeti Chopra And Raghav Chaddha : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी २४ सप्टेंबर रोजी उदयपूरमध्ये सात फेरे घेतले. त्याच्या लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्र उपस्थित होते.

परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (Raghav Chaddha) यांनी उदयपूरमध्ये नुकतेच सात फेरे घेतले आहेत. लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्र उपस्थित होते. परिणीती आणि राघव यांचे नुकतेच लग्न झाले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नात परिणीतीने राघव यांना खास गिफ्ट दिले आहे. या भेटवस्तूने परिणीतीने राघव यांचे मन जिंकले आहे. परिणीतीने त्यांच्या लग्नात राघव यांना एक गाणे समर्पित केले होते. परिणीतीने राघव यांच्यासाठी एक गाणे रेकॉर्ड केले होते.

परिणीती चोप्रा एक उत्तम अभिनेत्री असून एक चांगली गायिका देखील आहे. ती खूप छान गाते आणि अनेकदा तिचे गाण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते. परिणीतीने राघव यांच्यासाठी ओ पिया हे गाणे गायले आहे. परिणीतीने ओ पिया हे गाणे रेकॉर्ड करून गिफ्ट केले आहे. परिणीतीने या गाण्यातून राघव यांच्यावरचे तिचे प्रेम व्यक्त केले आहे. हे गाणे गौरव दत्ता यांनी संगीतबद्ध केले असून गौरव, सनी एमआर आणि हरजोत कौर यांनी ते लिहिले आहे. या गाण्याचे बोल ओ पिया, ओ पिया, चल चले. बाट लें गम-खुशी साथ में असे आहेत.

मुंबईत होणार रिसेप्शन लग्नानंतर परिणीती आणि राघव उदयपूरहून दिल्लीला रवाना झाले. रिपोर्ट्सनुसार, हे कपल चंदीगड आणि दिल्लीमध्ये रिसेप्शन देणार होते. जिथे अनेक राजकारणी उपस्थित राहणार होते.आता न्यूज 18 च्या वृत्तानुसार, चंदीगड आणि दिल्लीतील रिसेप्शन रद्द करण्यात आले असून आता मुंबईत रिसेप्शन देण्यात येणार आहे. ज्यामध्ये दोघांचे मित्र सहभागी होतील. रिसेप्शनला परिणीती बॉलिवूड सेलिब्रिटींना आमंत्रित करणार आहे. हे रिसेप्शन ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

टॅग्स :परिणीती चोप्रा