Join us

Parineeti-Raghav Wedding: आली समीप घटिका! परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढाचं वेडिंग कार्ड समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 18:27 IST

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचं वेडिंग कार्ड सोशल मीडियावर व्हायरल, 'या' दिवशी बांधणार लग्नगाठ

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. परिणीती आणि राघवने प्रेमाची कबुली देत मे महिन्यात साखरपुडा केला होता. त्यांच्या साखरपुड्याचे फोटोही व्हायरल झाले होते. त्यानंतर त्यांच्या लग्नाबाबात चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. सप्टेंबर महिन्यात लग्न करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. आता परिणीती आणि राघव यांचं वेडिंग कार्ड समोर आलं आहे. 

राघव चड्ढा आणि परिणीती चोप्राच्या घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस ते विवाहबंधनात अडकणार आहेत. २३-२४ सप्टेंबरपासून परिणीती आणि राघव यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात होणार आहे. चंदीगडमधील ताज हॉटेलमध्ये त्यांचं ग्रँड वेडिंग रिसेप्शन पार पडणार आहे. परिणीती आणि राघवच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.  

"....म्हणून मी आईचं नाव लावतो", भूषण प्रधानचा खुलासा, म्हणाला, "लोकांना वाटतं माझ्या आईवडिलांचा घटस्फोट..."

"याने देशाची प्रगती होणार का?", देशाचं नाव भारत करण्यावरुन प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचं संतप्त ट्वीट

'इन्स्टंट बॉलिवूड' या पापाराझी पेजवरुन राघव आणि परिणीतीचं वेडिंग रिसेप्शन कार्ड शेअर करण्यात आलं आहे. यानुसार ३० सप्टेंबरला राघव आणि परिणीतीच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा असणार आहे. त्यांच्या रिसेप्शन सोहळ्याला बॉलिवूडमधील सेलिब्रिटीही हजेरी लावणार आहेत. 

टॅग्स :परिणीती चोप्राबॉलिवूड