Join us

लग्नानंतर हनीमूनला जाणार नाही परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा?, काय आहे कारण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 11:18 IST

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी २४ सप्टेंबर रोजी उदयपूरमध्ये सात फेरे घेतले.

परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (Raghav Chaddha) यांनी उदयपूरमध्ये नुकतेच सात फेरे घेतले आहेत. लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्र उपस्थित होते. परिणीती आणि राघव यांचे नुकतेच लग्न झाले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नानंतर दोघे लवकरच त्यांच्या जवळच्या मित्रांसाठी  रिसेप्शन पार्टी आयोजित करणार आहेत. याच दरम्यान परिणीती आणि राघव यांच्याशी संबंधीत आणखी एक बातमी समोर येतेय. 

मीडिया रिपोर्टनुसार, परी आणि राघव चड्ढा यांचा हनीमूनला जाण्याच्या कोणत्याच प्लानचं नियोजन नाही केलंय. दोघे कदाचित हनीमूनला जाणार नाहीत. दोघेही आपल्या राहिलेल्या कामावर लक्ष केंद्रित करणार आहेत, त्यामुळे त्यांनी हनीमूनला जायचा कोणताच प्लान केला नाही. परिणीती तिचा आगामी सिनेमा 'मिशन रानीगंज'च्या प्रमोशनमध्ये बिझी होणार आहे. सध्या ती सासरच्यांसोबत फॅमिली टाईम एन्जॉय करतेय.         

रिपोर्टनुसार, परिणीती दिल्ली सासरी क्वॉलिटी टाईम स्पेंट केल्यानंतर मुंबईत परतणार आहे. मुंबईत आल्यावर ती आपल्या कामाला सुरुवात करणार आहे. ज्यात तिच्या 'मिशन रानीगंज' सिनेमाच्या प्रमोशनाही समावेश आहे.  

परिणीती आणि राघव यांनी याआधी दिल्ली आणि चंडीगढमध्ये होणारी रिसेप्शन पार्टी रद्द केली आहे. आता फक्त मुंबईत ते  रिसेप्शन देणार आहेत. परिणीती आणि राघव मुंबईत त्यांच्या मित्रांसाठी पार्टी देणार आहेत. ही पार्टी 4 ऑक्टोबरला मुंबईत होणार आहे. परिच्या मुंबईतील रिसेप्शन पार्टीला बॉलिवूड स्टार्स हजेरी लावणार  आहेत.

टॅग्स :परिणीती चोप्रा