Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा कुठे जाणार हनिमूनला? असा आहे त्यांच्या संपूर्ण प्लान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 18:10 IST

साखरपुड्याप्रमाणेच चोप्रा – चड्ढा कुटुंबाने परिणीती – राघव यांच्या लग्नाबद्दल मौन बाळगले आहे.

कलाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. आता अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) देखील लवकरचं विवाह बंधनात अडकणार आहे. परिणीती चोप्राने १३ मे रोजी आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्यासोबत साखपुडा केला आहे. साखरपुड्यानंतर आता ती विवाहबद्ध कधी होणार, हे जाणून घेण्यासाठी सर्व उत्सुक आहेत. साखरपुड्याप्रमाणेच चोप्रा – चड्ढा कुटुंबाने परिणीती – राघव यांच्या लग्नाबद्दल मौन बाळगले आहे.

परिणीती-राघव या वर्षाच्या अखेरीस लग्न करू शकतात, असे बोलले जात आहे. यासोबतच या कपलच्या हनिमून प्लॅनबाबतही चर्चा सुरू झाली आहे. चला जाणून घेऊया हनिमूनसाठी परिणीती आणि राघव कुठे जाणार आहेत.

बॉलिवूड सेलेब्स त्यांच्या लग्नापासून ते हनिमून डेस्टिनेशनपर्यंत अनेक गोष्टींना घेऊन चर्चेत असतात. सध्या फक्त परिणीती आणि राजकारणी राघव चढ्ढा यांचाच बोलबाला आहे. सोशल मीडियावर या कपलच्या हनीमूनच्या ठिकाणाबाबतही अंदाज बांधले जात आहेत. याविषयी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, परिणीती हनीमूनसाठी ग्रीस किंवा मालदीवमध्ये जाऊ शकते. ही दोन्ही ठिकाणे अतिशय सुंदर आहेत. हे कपल  त्यांच्या हनिमूनसाठी कुठे जाणार हे आपल्याला लवकरच कळले. 

परिणीती राघव यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगायचं तर, परिणीती आणि राघव यांचं एकाच कॉलेजमध्ये शिक्षण झाले असले तरी, दोघांच्या प्रेमाची सुरुवात मात्र नुकताच झाली आहे. दोघे पंजाब येथे भेटले आणि दोघांमधील प्रेम बहरले. परिणीती तेव्हा पंजाब येथे सिनेमाचे शुटिंग करत होती. तेव्हाच दोघांची भेट झाली आणि भेटीचं रुपांतर प्रेमात झाले असे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :परिणीती चोप्रा