Join us

Raghav-Parineeti : राघव-परिणीतीच्या रिंग सेरेमनीची तयारी सुरू, कपलच्या साखरपुड्याची तारीखही आली समोर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 20:21 IST

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या अफेअरची बरीच चर्चा आहे. जरी या जोडप्याने अद्याप त्यांचे नाते अधिकृत केले नाही. तरी या कपलच्या एंगेजमेंटची तारीखही आली आहे.

Parineeti -Raghav Engagement Date: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजकारणी राघव चढ्ढा त्यांच्या अफेअरच्या बातम्यांमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. जरी या जोडप्याने अद्याप त्यांचे नाते अधिकृत केले नाही. मात्र प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता हार्डी संधूने यांच्या  नात्यावर शिक्कामोर्तब केला होता. आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांनी ट्वीट करत परिणीत व राघव चड्ढा यांना शुभेच्छा दिल्या होत्या. या सगळ्या दरम्यान या कपलच्या एंगेजमेंटची तारीखही समोर आली आहे. जाणून घेऊया परिणीती आणि राघव एकमेकांना एंगेजमेंट रिंग कधी घालणार आहेत?

साखरपुड्याची तारीख आली समोरमीडिया रिपोर्ट्सनुसार, परिणीती आणि राघव या आठवड्यात म्हणजे 10 एप्रिलला एंगेजमेंट करू शकतात. रिपोर्ट्सनुसार, परिणीती आणि राघव दिल्लीत एका इंटिमेट रिंग सेरेमनीनंतर त्यांच्या नात्याला अधिकृत करतील. या  एंगेजमेंट फंक्शनमध्ये फक्त त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी होतील.

मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली परिणीतीया सगळ्या दरम्यान परिणीती एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. लाल स्वेटर, काळी पँटमध्ये अभिनेत्री नेहमीप्रमाणेच खूपच सुंदर दिसत होती. यावेळी परिणीतीने चष्मा लावला होता आणि तिने तिचे केस मोकळे ठेवले होते. 

राघव आणि परिणिती या दोघांनीही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिक्षण घेतलं आहे आणि त्यांचे अनेक कॉमन फ्रेन्ड्स आहेत. परिणीती चोप्रा नुकतीच राघव चड्ढांसोबत मुंबईत स्पॉट झाली होती. दोघेही एकत्र डिनर डेट एन्जॉय करताना दिसले होते. तेव्हापासून दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. 

टॅग्स :परिणीती चोप्रा