Join us

परिणीती चोप्रा आणि अर्जुन कपूर बोलणार आता 'नमस्ते इंग्लंड'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 14:57 IST

अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्राचा आगामी चित्रपट 'नमस्ते इंग्लंड'चे  शूटिंग सुरू झाले असून या चित्रपटाचे शूटिंग वेगवेगळ्या देशात होणार ...

अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्राचा आगामी चित्रपट 'नमस्ते इंग्लंड'चे  शूटिंग सुरू झाले असून या चित्रपटाचे शूटिंग वेगवेगळ्या देशात होणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या टप्प्याचे शूटिंग अमृतसरमध्ये झाले त्यावेळेस ह्या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने सुवर्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतले. परिणीती आणि अर्जुन मोठ्या गॅपनंतर पडद्यावर पुनरागमन करत आहेत. अर्जुन आणि परिणीतीच्या नमस्ते इंग्लंड चे शूटिंग आजपासून सुरू झाले. विपुल अमृतलाल शहा ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून हा चित्रपट रोमाँटिक कॉमेडी चित्रपट आहे. नमस्ते इंग्लंडचे पहिल्या टप्प्यातील शूटिंग आज पासून सुरु होणार असून ह्या चित्रपटाचे शूटिंग मुबंई, पंजाब आणि लंडनमध्ये होणार आहे. या चित्रपटाचे पहिले शूटिंग अमृतसर आणि लुधियानामधून सुरू होईल नंतर ह्या चित्रपटाची टीम बांगलादेश आणि ढाकामध्ये जाईल. चित्रपटांच्या काही भागांचे शूटिंग बेल्जियम आणि ब्रसेल्समध्ये सुद्धा होणार आहे. विपुल शाहने या आधी कॅटरिना कैफ आणि अक्षय कुमार बरोबर 'नमस्ते लंडन' हा चित्रपट केलेला आहे. नमस्ते लंडन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट गेला होता. आता परिणीती आणि अर्जुनला घेऊन याचा पुढचा भाग तयार करण्यात येतो आहे. नुकतेच दोघांनी त्यांच्या 'संदीप और पिंकी फरार'ची शूटिंग पूर्ण केली आहे. हा चित्रपट भारत विरूद्ध इंडियाच्या कल्पनेवर आधारित असल्याचे त्याने सांगितले होते. गेल्या काही काळात आपला देश भारत विरूद्ध इंडिया अशा वेगळ्यात गुंत्यात फसलेला दिसतोय. दोन वेगवेगळ्या विचारधारांचा संघर्ष देशात पाहायला मिळतो आहे. ‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपट याच विचारधारेवर बेतलेला असेल. या चित्रपटातून पुन्हा एकदा परिणीती आणि अर्जुन कपूर स्क्रिन शेअर करणार आहे.  दिबाकर बॅनर्जी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. अर्जुन कपूर पोलिस कर्मचाºयाच्या भूमिकेत दिसणार आहे. 6 ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.