परिणिती चोपडाने दाखविले तिचे स्ट्रेंच मार्क; युजर्सकडून मिळाल्या ‘या’ प्रतिक्रिया!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 14:51 IST
अभिनेत्री परिणिती चोपडाने स्ट्रेंच मार्क दिसत असलेला एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. तिच्या या फोटोला तुफान कॉमेण्ट्स मिळत आहेत.
परिणिती चोपडाने दाखविले तिचे स्ट्रेंच मार्क; युजर्सकडून मिळाल्या ‘या’ प्रतिक्रिया!
बॉलिवूडमधील बरेचसे असे सेलिब्रिटी आहेत, जे त्यांचे फोटो सोशल मीडियावर नियमितपणे शेअर करीत असतात. अर्थातच हे फोटो आनंदी क्षण अन् स्वत:चे वेगळेपण सांगणारे असतात. त्यामुळे फारच कमी असे सेलिब्रिटी आहेत जे त्यांच्यातील उणिवा फोटोमधून दाखवित असतात. बरेचसे सेलिब्रिटी तर आपल्यातील उणिवा दाखविण्यासाठी बºयाचशा फिल्टर आणि फोटोशॉपची मदत घेत असतात. मात्र अभिनेत्री परिणिती चोपडा यास अपवाद आहे. होय, परिणिती चोपडाने काही वेळापूर्वीच इन्स्टाग्रामवर असा फोटो शेअर केला जो बघून तिचे चाहते आश्चर्यचकित झाले नसतील तरच नवल. होय, परिणितीने शेअर केलेल्या फोटोमध्ये चक्क तिचे स्ट्रेच मार्क दिसत आहेत. परिणितीचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड पसंत केला जात आहे. शिवाय तिचा हा फोटो वाºयासारखा व्हायरलही होत आहे. आतापर्यंत तिच्या या फोटोला ६ लाखांपेक्षा अधिक लाइक्स आणि तीन हजारांपेक्षा अधिक कॉमेण्ट्स मिळाल्या आहेत. यातील जवळपास सगळ्याच कॉमेण्ट्समध्ये परिणितीचे कौतुक केले जात आहे. स्ट्रेच मार्क्स लपविण्यापेक्षा ते बिनधास्तपणे दाखविल्यामुळे तिच्यावर जणूकाही कौतुकाचा वर्षावच केला जात आहे. परिणितीने अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत ‘इश्कजादे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. २०१४ मध्ये रिलीज झालेल्या तिच्या ‘किल दिल’नंतर तिने बॉलिवूड इंडस्ट्रीमधून जवळपासून तीन वर्षांचा ब्रेक घेतला. या ब्रेकदरम्यान तिने तिच्या बॉडी आणि वजनावर काम केले. सुरुवातीला परिणितीचे वजन खूप वाढलेले होते. मात्र आता तिने स्लिम फिगर मिळविला आहे. दरम्यान, परिणिती अखेरीस अजय देवगणच्या ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटात बघावयास मिळाली होती.