भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर देशभर जल्लोषाचे वातावरण आहे. पुलवामा येथील पाकिस्तानने घडवून आणलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या १२व्या दिवशी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हवाई हल्ले करत, ३०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला.भारतीय हवाई दलाच्या या दमदार कारवाईचे देशवासियांनी जल्लोषात स्वागत केले. या स्वागत करणाºयांमध्ये भाजपाचे खासदार आणि अभिनेते परेश रावल यांचेही नाव होते. ही ख-या अर्थाने चांगली सकाळ होती, अशा शब्दात परेश रावल यांनी आनंद व्यक्त केला. यानंतर परेश रावल यांनी थेट पाकिस्तानी कलाकारांच्या मर्मावर घाव घातला. पाकिस्तानी अभिनेता अली जफरला त्यांनी जोरदार टोला लगावला. ‘आता बोलती बंद झाली का?’ असे ट्विट करत त्यांनी अली जफरला लक्ष्य केले.
झाली का बोलती बंद...? परेश रावल यांचा पाकी अभिनेता अली जफरला सणसणीत टोला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 14:36 IST
‘आता बोलती बंद झाली का?’ असे ट्विट करत त्यांनी अली जफरला लक्ष्य केले.
झाली का बोलती बंद...? परेश रावल यांचा पाकी अभिनेता अली जफरला सणसणीत टोला!
ठळक मुद्देभारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तान चवताळला आहे. याच भावनेतून पाकिस्तानने भारताच्या चित्रपटांवर बंदी घातली आहे.