Join us
Daily Top 2Weekly Top 5

परेश रावल यांनी दोनदा पाहिला 'धुरंधर २', रणवीर नाही तर 'या' अभिनेत्याचं केलं भरभरून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 08:51 IST

अभिनेते परेश रावल यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'धुरंधर: द रिव्हेंज'चे तोंडभरून कौतुक केले आहे.

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर: द रिव्हेंज' या स्पाय थ्रिलर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सामान्य प्रेक्षकांसोबतच चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारही या सिनेमाच्या प्रेमात पडले आहेत. ज्येष्ठ अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'धुरंधर: द रिव्हेंज'चे तोंडभरून कौतुक केले आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट त्यांनी एकदा नाही तर तब्बल दोनदा पाहिला आहे. या चित्रपटातील रणवीरचा नाही तर आर. माधवनच्या भूमिकेने ते विशेष प्रभावित झाले आहेत.

'जागरण'ला दिलेल्या मुलाखतीत परेश रावल म्हणाले, "मी 'धुरंधर २' पाहून प्रचंड प्रभावित झालो आहे. मी पहिला भाग दोनदा आणि आता दुसरा भागही दोनदा पाहिला आहे. तरीही मला पुन्हा जाऊन तो पाहावासा वाटतोय. या चित्रपटात इतकी माहिती आणि बारकावे आहेत की प्रेक्षक त्याचा नक्कीच आनंद घेतील".

पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग अधिक सखोल आणि रंजक असल्याचेही त्यांनी नमूद केले. चित्रपटात आर. माधवन याने साकारलेल्या 'अजय सन्याल' या पात्राबद्दल परेश रावल यांनी विशेष आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, "अजित डोवाल आपल्या देशाचे खरे नायक आहेत आणि आर. माधवनसारख्या सकस अभिनेत्याने त्यांचे प्रतिनिधित्व करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याने केलेले काम अप्रतिम आहे".

दरम्यान, 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक'मध्ये अशाच प्रकारचे महत्त्वाचे पात्र परेश रावल यांनी साकारले होते. आता परेश रावल यांनी दिग्दर्शक आदित्य धर यांच्याकडे  मिश्किल मागणी करत म्हटलं की त्यांना या चित्रपटात 'अजय सन्याल'च्या जुळ्या भावाची भूमिका करायला नक्कीच आवडेल. परेश रावल लवकरच अक्षय कुमारसोबत 'भूत बंगला' मध्ये दिसणार आहेत. याशिवाय, 'वेलकम टू द जंगल', 'हेरा फेरी ३' आणि 'भागम भाग २' यांसारखे त्यांचे मोठे चित्रपट रांगेत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Paresh Rawal Praises R. Madhavan's Role in 'Dhurandar 2'

Web Summary : Paresh Rawal lauded 'Dhurandar 2', watching it twice and praising R. Madhavan's portrayal of Ajay Sanyal, calling it exceptional. He expressed admiration for the film's depth and R. Madhavan's acting.
टॅग्स :परेश रावलधुरंधर सिनेमाआर.माधवनरणवीर सिंग