Join us

"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण..:; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला

By देवेंद्र जाधव | Updated: April 28, 2025 09:13 IST

परेश रावल यांना अजय देवगणचे वडील वीरु देवगण यांनी लघवी प्यायचा सल्ला दिला होता. काय होतं यामागचं कारण? परेश रावल यांनी स्वतःती लघवी प्यायल्यानंतर काय घडलं, याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केलाय

परेश रावल (paresh rawal) हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. परेश यांना आपण 'हेरा फेरी', 'फिर हेरा फेरी', 'भागम भाग', 'भूल भूलैय्या' अशा सिनेमांमधून परेश रावल यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. याशिवाय 'वास्तव', 'द स्टोरीटेलर' यासारख्या सिनेमांमधून परेश रावल यांनी गंभीर भूमिकाही साकारल्या. नुकत्याच एका मुलाखतीत परेश रावल यांनी सलग १५ दिवस स्वतःची लघवी प्यायली असल्याचा खुलासा करुन सर्वांना चकीत करुन सोडलंय. काय म्हणाले परेश रावल बघा.

परेश रावल यांनी स्वतःची लघवी का प्यायली?

हा किस्सा असा आहे की, परेश रावल 'घातक' या सिनेमाचं शूटिंग करत होते. या सिनेमाचं शूटिंग करताना परेश यांच्या गुडघ्याला दुखापत झाली. या दुखापतीनंतर टीनू आनंद आणि डॅनी डेन्जोंगपा परेश यांना नानावटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. या जबर दुखापतीमुळे माझं करिअर संपलं, अशी परेश रावल यांना भीती वाटली. त्याचवेळी अजय देवगणचे वडील आणि दिवंगत अॅक्शन डायरेक्टर वीरु देवगण यांनी परेश रावल यांना स्वतःची लघवी पिण्याचा सल्ला दिला. 

लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत परेश रावल यांनी हा किस्सा सविस्तर सांगितला. परेश रावल म्हणाले, "मी जेव्हा नानावटी हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा वीरु देवगण  मला भेटायला आले. त्यांनी माझ्या दुखापतीबद्दल चौकशी केली. तेव्हा सर्व ऐकून वीरु यांनी मला एक सल्ला दिला. सकाळी उठल्यावर स्वतःची लघवी पिण्यास त्यांनी मला सांगितलं. सकाळी उठल्यावर स्वतःची लघवी पिऊन सर्व दुखणं दूर होईल, असं ते म्हणाले. याशिवाय त्यांनी मला दारु, चिकन, तंबाखू या गोष्टी बंद करायला सांगितल्या." 

त्यानंतर वीरु देवगण यांचा सल्ला ऐकून पुढील १५ दिवस परेश रावल बिअरसारखी स्वतःची लघवी प्यायचे. १५ दिवसांनंतर जेव्हा एक्स रे रिपोर्ट आला तेव्हा डॉक्टर तो रिपोर्ट बघून आश्चर्यचकित झाले. एक्स रे रिपोर्टमध्ये एक पांढरी लाइन दिसत होती. याचाच अर्थ, परेश रावल यांची दुखापत बरी झाली होती. दुखापत बरी व्हायला साधारणः दोन-अडीच महिने लागतात. पण वीरु देवगण यांनी दिलेल्या एका सल्ल्यामुळे ही दुखापत दीड महिन्यातच बरी झाली, असं परेश रावल सांगतात. परेश रावल लवकरच 'हेरा फेरी ३' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

टॅग्स :परेश रावलअजय देवगणबॉलिवूड