Join us
Daily Top 2Weekly Top 5

पप्पा शाहरूख खानची ‘ही’ सवय मुलगी सुहानाला करते इरिटेड!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2017 17:43 IST

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याची लाडकी सुहाना खान हिला पप्पाच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी बॉलिवूडमध्ये एंट्री करायची आहे. होय, सुहाना ...

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याची लाडकी सुहाना खान हिला पप्पाच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी बॉलिवूडमध्ये एंट्री करायची आहे. होय, सुहाना तिच्या वडिलांप्रमाणेच बॉलिवूडवर सत्ता गाजवू इच्छिते. त्यामुळेच अभिनयाचे गुण शिकण्यासाठी ती नेहमीच शाहरूखसोबत सेटवर जात असते. मात्र, सुहानाला पप्पा शाहरूखची एक गोष्ट खूपच खटकते. ज्यामुळे ती खूपच इरिटेड होते. आता ही गोष्ट कुठली असावी, हे तुम्हाला खाली दिलेली माहिती वाचल्यानंतरच समजेल. काही दिवसांपूर्वीच सुहाना इम्तियाज अलीच्या ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सेटवर गेली होती. त्यावेळी शाहरूख पंजाबी गाण्याचे शूटिंग करीत होता. तीन सेकंदांच्या शॉटसाठी तो वारंवार रिटेक घेत होता. शॉट ओके असतानाही किंग खानने एक दोन नव्हे तर दहा टेक घेतले. वास्तविक दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी शॉटला केव्हाच हिरवा झेंडा दाखविला होता. मात्र अशातही शाहरूखला शॉटमध्ये काही तरी गडबड होत असल्याचे वाटत होते. ज्यामुळे त्याने तब्बल १० टेक घेतले. शाहरूखचा हा प्रताप त्याची लाडकी सुहानादेखील बघत होती. मात्र तिला ही बाब खूपच इरिटेड होत होती. ही बाब खुद्द शाहरूखनेच मान्य केली आहे. विशेष म्हणजे सुहानाने लगेचच पप्पा शाहरूखला याविषयी विचारले. सुहानाने म्हटले की, जर तीन सेकंदांच्या शॉटसाठी तुम्ही एवढे टेक का घेतले? तेव्हा शाहरूखने म्हटले की, ‘मला असे वाटतं की, शूटिंग करताना माझ्यात एकप्रकारचा उत्साह निर्माण होतो. जेव्हा मला असे वाटते की, हा शॉट मी व्यवस्थित देऊ शकलो नाही, तेव्हा मी तो पुन्हा करतो. खरं तर माझे मुले मला चांगल्या पद्धतीने ओळखतात. माझी ही सवय त्यांना खूपच त्रस्त करते. मात्र शाहरूखची ही सवय जरी त्याच्या मुलांना खटकत असली तरी, ही मेहनतच त्याला ‘बॉलिवूडचा किंग’ बनविते. काही दिवसांपूर्वीच शाहरूख आणि त्याची मुलगी सुहाना एका पार्टीत बघावयास मिळाले होते. यावेळी सुहानाने घातलेला ड्रेस चर्चेचा विषय ठरला होता. या रेड ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. त्यामुळे सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. या शॉट ड्रेसमध्ये सुहाना बॉलिवूडची अभिनेत्री वाटत होती. या ड्रेसमधील तिचे फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.