पापा सुनील शेट्टीसोबत डान्स करतानाचा आथिया शेट्टीचा व्हिडीओ होतोय व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 20:37 IST
अभिनेता सुनील शेट्टी आणि त्याची लाडकी लेक आथियाचा हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आथिया पापा सुनीलसोबत डान्स करताना दिसत आहे.
पापा सुनील शेट्टीसोबत डान्स करतानाचा आथिया शेट्टीचा व्हिडीओ होतोय व्हायरल!
अभिनेता सुनील शेट्टीची लाडकी लेक आथिया शेट्टी बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान बळकट करण्यासाठी अजुनही धडपड करीत आहे. आथिया सध्या आपल्या लूक आणि अभिनयावर प्रचंड मेहनत घेत असून, वडिलांचा वारसा समर्थपणे चालविण्याचा प्रयत्न करीत आहे. आथिया सोशल मीडियावरही प्रचंड अॅक्टिव्ह आहे. ती नियमितपणे तिचे फोटोज् चाहत्यांसाठी शेअर करीत असते. आता असाच एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये आथिया पापा सुनील शेट्टीसोबत डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ आथियाच्या लहानपणीचा असून, त्यामध्ये ती भाऊ अहान शेट्टीसोबत खेळताना दिसत आहे. व्हिडीओ बघून असे वाटत आहे की, सुनील शेट्टीच्या घरी एखाद्या पार्टीचे आयोजन केले असावे. हा व्हिडीओ शेअर करताना आथियाने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी माझ्या जुन्या दिवसांचे स्मरण करीत आहे. पापा सुनील शेट्टीसोबत गुरुवारची रात्र काहीशी अशी होती.’ आथियाचा हा व्हिडीओ आतापर्यंत दोन लाखांपेक्षा अधिक लोकांनी बघितला आहे. इन्स्टाग्रामवर १.९ मिलियन फॉलोअर्सची मालकिन असलेली आथिया अखेरीस ‘मुबारका’ या चित्रपटात झळकली होती. अनीस बज्मी यांच्या या चित्रपटात आथियासोबत अर्जुन कपूर, अनिल कपूर बघावयास मिळाले होते. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरला. त्यामुळे सोशल मीडियावरील तिच्या फॅन फॉलोइंगमध्येही जबरदस्त भर पडली.