Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबू भैय्याच्या भूमिकेत परेश रावलच्या जागी दिसणार पंकज त्रिपाठी? जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 16:30 IST

Hera Pheri 3 Movie : गेल्या काही दिवसांपासून हेरा फेरी ३ सिनेमा चर्चेत आला आहे. अलिकडेच परेश रावल यांनी या चित्रपटाला रामराम केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय चित्रपट फ्रँचायझींपैकी एक असलेल्या हेरा फेरीचा तिसरा भाग (Hera Pheri 3) चर्चेत आला आहे. या चित्रपटाबद्दल प्रचंड सस्पेन्स निर्माण झाला आहे. चित्रपटाच्या तिसऱ्या भागाच्या प्रोमो शूटनंतर, बाबू भैय्याच्या भूमिकेत प्रेक्षकांची मने जिंकणारे परेश रावल (Paresh Rawal) यांनी चित्रपटाला रामराम केला. त्यानंतर अक्षय कुमारसोबत त्यांची कायदेशीर लढाई सुरूच आहे. दरम्यान, चित्रपटात बाबू भैय्याच्या भूमिकेत असलेल्या नवीन अभिनेत्याच्या नावाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत, जो परेश रावल यांची जागा घेईल आणि त्यांचा वारसा पुढे नेईल.

परेश रावल यांनी चित्रपट सोडल्यानंतर, त्यांची जागा घेणाऱ्या ज्या अभिनेत्याचे नाव समोर आले ते म्हणजे पंकज त्रिपाठीचं. बाबू भैय्याच्या भूमिकेत पंकज त्रिपाठीच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा आहे. या चर्चेदरम्यान, 'बाबू भैय्या'च्या भूमिकेतील अभिनेत्याचा एक फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून नेटकरी असा अंदाज लावत आहेत की, निर्मात्यांनी पंकज त्रिपाठीला कास्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या व्हायरल फोटोमागचे सत्य जाणून घेऊयात.  

खरेतर, 'एक्स'वर व्हायरल होत असलेल्या बाबू भैयाच्या भूमिकेतील पंकज त्रिपाठीचा फोटो एआय जनरेटेड आहे. तो एआयने तयार केला आहे आणि त्याची तुलना परेश रावल यांच्याशी केली आहे. हा फोटो समोर येताच सोशल मीडिया युजर्संनेही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. फोटोवर कमेंट करताना एकाने लिहिले की, 'पंकज त्रिपाठी या पात्रात काही मूल्य आणू शकतात, पण तो रिप्लेसमेंट असू शकत नाही. तो पुननिर्माण असेल. तो कदाचित स्पिन-ऑफ किंवा रिबूटमध्ये 'बाबू भैया' सारखी चांगली भूमिका साकारू शकतो, परंतु थेट परेश रावलची जागा घेणे विचित्र ठरेल.'

'बाबू भैया'च्या भूमिकेबाबत पंकज त्रिपाठी म्हणाला..बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत पंकज त्रिपाठीने 'हेरा फेरी ३' मध्ये परेश रावल यांची जागा घेण्याबाबत बोलताना म्हटले होते की, ते कधीही त्यांची जागा घेऊ शकणार नाहीत. बाबू भैयाच्या भूमिकेत दिसण्याबाबत पंकज त्रिपाठी म्हणाले, "परेश भाई एक उत्तम अभिनेता आहे. मी त्यांच्या जागी कसा असू शकतो, लोक ट्विटरवर त्यांचे मत देत असतील." मात्र, परेश रावल यांनी चित्रपट सोडल्यानंतर पुढचा बाबू भैया कोण असेल हे निर्मात्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. 

टॅग्स :परेश रावलपंकज त्रिपाठी