Join us

  - म्हणून ‘83’ची अख्खी टीम पंकज त्रिपाठींपासून राहतेय चार हात लांब!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 07:15 IST

सध्या ‘83’ची अख्खी टीम पंकज त्रिपाठीपासून चार हात लांब राहतेय. इतकेच नाही तर रणवीर सिंगनेही पंकज यांना प्रेमाने मिठी मारणे सोडले आहे.

ठळक मुद्दे न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांचे तर प्रचंड कौतुक करण्यात आले.

‘मिर्झापूर’ या वेब सीरिजमधील कालीन भैय्याच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेलेअभिनेते पंकज त्रिपाठी लवकरच ‘83’ या चित्रपटात दिसणार आहेत. रणवीर सिंग स्टारर या चित्रपटात पंकज त्रिपाठी मॅनेजर मान सिंगची व्यक्तिरेखा साकारत आहेत. पण सध्या ‘83’ची अख्खी टीम पंकज त्रिपाठीपासून चार हात लांब राहतेय. इतकेच नाही तर रणवीर सिंगनेही पंकज यांना प्रेमाने मिठी मारणे सोडले आहे. असे का? तर पंकज त्रिपाठींना झालेली दुखापत.

होय, अलीकडे पंकज त्रिपाठी यांना त्यांच्या मुंबईत नवीन घराच्या कॅम्पसमध्ये अपघात झाला होता. त्याच्या खांद्याला आणि हाताला मार लागला होता. तेव्हा त्यांनी या दुखण्याकडे दुर्लक्ष केले होते आणि औषध घेऊन सुट्टीसाठी स्कॉटलंडला रवाना झाले होते. तेथूनच त्यांना ‘83’च्या शूटींगसाठी  लंडनला जावे लागणार होते.  पण  स्कॉटलंडमध्ये सुटी घालवत असताना पंकज यांच्या पोटात आणि छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. मेडिकल चेकअपनंतर त्यांच्या तीन बरगड्या तुटल्याचे समजले.

 अशाही परिस्थितीत त्यांनी ‘83’चे शूटींग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. पण पंकज यांची दुखापत इतकी गंभीर आहे की, ‘83’च्या सेटवर प्रत्येकाने त्यांची काळजी घेत आहे. खुद्द पंकज यांनी याबद्दल सांगितले. ते म्हणाले की,माझ्या बरगड्या तुटल्याने ‘83’च्या टीममधील प्रत्येकजण माझी विशेष काळजी घेत आहे. सगळेजण माझ्याशी अंतर राखून  बोलतात. रणवीरने तर मला मिठी मारणेही सोडले आहे. असे केल्याने मला त्रास होईल, असे त्याला वाटते.

पंकज यांनी रण या चित्रपटानंतर अपहरण, ओमकारा, धर्म यांसारख्या अनेक चित्रपटात छोट्याशा भूमिका साकारल्या. आठ वर्षांनी त्यांना ‘गँग्स आॅफ वासेपूर’ या चित्रपटात एक चांगली भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या कारकिर्दीला नवे वळण मिळाले.  या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांचे तर प्रचंड कौतुक करण्यात आले.

टॅग्स :पंकज त्रिपाठीरणवीर सिंग८३ सिनेमा