Join us

पंकज त्रिपाठींची लेक, वयाच्या १८ व्या वर्षीच लाईमलाईटमध्ये आली; साधेपणावर खिळल्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 12:26 IST

पंकज त्रिपाठी आपली पत्नी मृदुला आणि लेक आशीसोबत 'मेट्रो इन दिनो'च्या स्क्रीनिंगसाठी आले होते.

अनुराग बसू दिग्दर्शित 'मेट्रो इन दिनो' सिनेमा आज रिलीज झाला. काल या सिनेमाचं स्क्रीनिंग आयोजिक करण्यात आलं होतं. सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट आणि बॉलिवूडमधील इतर कलाकार स्क्रीनिंगसाठी पोहोचले होते. सिनेमात आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, अली फजल, फातिमा सना शेख, नीना गुप्ता, अनुपम खेर, पंकज त्रिपाठी आणि कोंकणा सेनची भूमिका आहे. काल झालेल्या स्क्रीनिंगला पंकज त्रिपाठींनी (Pankaj Tripathi)  कुटुंबासोबत हजेरी लावली. यावेळी त्यांच्या लेकीवर सर्वांच्या नजरा खिळल्या.

पंकज त्रिपाठी आपली पत्नी मृदुला आणि लेक आशीसोबत 'मेट्रो इन दिनो'च्या स्क्रीनिंगसाठी आले होते. तिघांनी कॅमेऱ्यासमोर पोज दिली.  यावेळी आशी डार्क रंगाच्या जंपसूटमध्ये दिसली. तिच्या साध्या, सुंदर लूकवर सर्वांच्याच नजरा खिळल्या होत्या. पंकज त्रिपाठी केशरी रंगाच्या सूटमध्ये दिसले. तर त्यांची पत्नी मृदुला यांनी सुंदर अनारकली ड्रेस परिधान केला होता. या साध्या कुटुंबाचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. 

आशी ही सुद्धा अभिनय क्षेत्रात येण्यासाठी प्रयत्न करत आहे. काही महिन्यांपूर्वीच ती 'रंग डारो' या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली. तिच्या सौंदर्याने सर्वांना घायाळ केलं. वडिलांसारखाच तिच्यातही साधेपणा आल्याचं स्पष्ट दिसून येतं. आशी सोशल मीडियावर फारशी सक्रीय नसते. पंकज त्रिपाठी आणि मृदुला लेकीसोबत फोटो शेअर करत असतात. आशी फक्त १८ वर्षांची आहे. मुंबईतील एक कॉलेजमध्ये ती शिक्षण घेत आहे.  

टॅग्स :पंकज त्रिपाठीबॉलिवूड