Join us

पंकज त्रिपाठी ह्या सिनेमासाठी गिरवताहेत मल्याळम भाषेचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 08:00 IST

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत पंकज त्रिपाठीने तमीळ चित्रपट 'काला'मध्ये काम केल्यानंतर आता पंकज मल्याळम अभिनेत्री व डान्सर शकीला खानवर आधारीत बायोपिक 'शकीला'मध्ये दिसणार आहे.

ठळक मुद्दे'शकीला'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार पंकज त्रिपाठी'शकीला'तील भूमिकेला न्याय देण्यासाठी पंकज घेतोय मल्याळम भाषेचे धडे

बॉलिवूडमध्ये विविध भूमिका साकारून अभिनेता पंकज त्रिपाठीने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. 'न्यूटन' चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. नुकताच त्यांचा 'स्त्री' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या सिनेमातील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. सध्या ते मल्याळम भाषेचे धडे गिरवित असल्याचे समजते आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत पंकज त्रिपाठीने तमीळ चित्रपट 'काला'मध्ये काम केल्यानंतर आता पंकज मल्याळम अभिनेत्री व डान्सर शकीला खानवर आधारीत बायोपिक 'शकीला'मध्ये दिसणार आहे. तो या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. लवकरच तो या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. या चित्रपटातील त्याचे पात्र शकिलाच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याने अतिशय महत्त्वाचे मानले जात आहे. या चित्रपटातील आपली भूमिका वास्तविक वाटली पाहिजे आणि लोकांना भावली पाहिजे यासाठी पंकज सध्या मल्याळम भाषेचे धडे गिरवित आहे. आपली भूमिका व त्यातील संवाद फेक वाटू नयेत यासाठी मल्याळम भाषा शिकण्याचा निर्णय घेतल्याचे पंकज सांगतात. मल्याळम भाषा शिकल्याने शकीला चित्रपटातील आपल्या भूमिकेला योग्य न्याय देता येईल, असे त्याला वाटते.

अॅडल्ट सिनेमांमधून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या शकीलाने वयाच्या २०व्या वर्षी १९९५ साली आलेल्या प्लेगर्ल्स या पॉर्न सिनेमातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती.याच शकीलाचे वादग्रस्त आत्मचरित्रही प्रसिद्ध झाले होते. यांत शकीलाने अनेक धक्कादायक गौप्यस्फोट आणि खुलासे केले होते. तिचे हेच खुलासे आता सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर येणार आहेत. सिल्क स्मिता शकीलाची आदर्श आहे. शकीलाचे नाव अनेक दिग्दर्शक आणि कलाकारांशीही जोडलं गेले. तिच्या अफेअरच्या चर्चाही रंगल्या, मात्र ती अविवाहितच राहिली. तिचा हाच जीवनपट रुपेरी पडद्यावर रसिकांना पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :शकीला बायोपिक