Join us

कालीन भय्याच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेला हा अभिनेता आता करणार हॉलिवूडमध्ये एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 14:43 IST

पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला.

ठळक मुद्दे पंकज त्रिपाठीची हॉलिवूडमध्ये एन्ट्रीख्रिस हेम्सवर्थसोबत झळकणार पंकज त्रिपाठी

अभिनेता पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. या भूमिकेमुळे तो चांगलाच चर्चेत आला होता. आता तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. 

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमात तो अॅव्हेंजर फेम अभिनेता ख्रिस हेम्सवर्थसोबत झळकणार आहे. 

 

ख्रिस हा मागील नोव्हेंबर महिन्यात ढाका या सिनेमाच्या शूटिंगसाठी भारतात होता. दिग्दर्शक सॅम हारग्रेव्ह याने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. मुंबई आणि अहमदाबाद या ठिकाणी हे शुटिंग होते. या सिनेमात पंकज त्रिपाठीसोबत रणदीप हुडा आणि मनोज वाजपेयी हे देखील सिनेमात झळकणार आहेत. बँकॉक आणि थायलँड या ठिकाणी या सिनेमाचे चित्रीकरण होणार असल्याचेही समजते आहे.सूत्रांच्या माहितीनुसार पंकज त्रिपाठी या चित्रपटाच्या शूटिंगसाठी बँकॉकमध्ये दाखल होणार आहे. चित्रपटाच्या पुढील भागाचे शूटिंग थायलंडमध्ये होणार आहे. ढाका हा थरारपट असून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाणार आहे. पंकज त्रिपाठीला ख्रिससोबत स्क्रीन शेअर करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :८३ सिनेमा