सध्या 'धुरंधर २'ची खूप चर्चा आहे. काहीच दिवसांत 'धुरंधर २' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'धुरंधर' सिनेमाचा पहिला भाग आला तेव्हा त्याची गाणी चांगलीच गाजली. याच सिनेमात संजय दत्तची जेव्हा सिनेमा एन्ट्री होते तेव्हा बॅकग्राऊंडला 'हवा हवा' हे गाणं वाजतं. संजय दत्त चौधरी अस्लमच्या भूमिकेत दिमाखात एन्ट्री घेतो. अवघ्या २ मिनिटांसाठी हे गाणं सिनेमात ऐकायला मिळालं. हे मूळ गाणं पाकिस्तानी गायकाचं आहे. त्यामुळे या गायकाला किती पैसे मिळालेत? जाणून घ्या.'हवा हवा' या गाण्यामुळे ८० च्या दशकातील गाजलेले गायक हसन जहांगीर सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या चित्रपटातील गाण्याला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर हसन जहांगीर यांनी एका मुलाखतीत या गाण्याच्या मानधनाबद्दल थक्क करणारा खुलासा केला आहे.
हसन जहांगीर यांनी सांगितले की, चित्रपटाच्या निर्मात्यांनी जेव्हा या गाण्याचे हक्क मागितले आणि त्यांना गाण्यासाठी विचारणा केली, तेव्हा त्यांना या कामासाठी ४५ लाख रुपये मानधन देण्यात आले. आजच्या काळात ही रक्कम खूपच जास्त आहे. पैशांपेक्षा हसन जहांगीर यांच्यासाठी गाण्याची लोकप्रियता जास्त महत्त्वाची ठरली. त्यांनी आनंदाने हे मानधन स्वीकारले कारण त्यांना हे गाणे नव्या पिढीसमोर एका भव्य रूपात न्यायचे होते.
'हवा हवा' हे गाणं मूळतः १९८० च्या दशकात प्रसिद्ध झाले होते आणि त्यावेळीही ते प्रचंड लोकप्रिय ठरले होते. हसन जहांगीर म्हणतात की, "हे गाणं केवळ भारत किंवा पाकिस्तानपुरते मर्यादित राहिले नाही, तर जगभरातील संगीतप्रेमींनी याला डोक्यावर घेतले आहे. चित्रपटात हे गाणं पुन्हा वापरल्यामुळे आजची तरुण पिढी देखील या गाण्यावर थिरकत आहे, हे पाहून मला खूप समाधान वाटते." एकूणच हसन यांनी 'धुरंधर' चित्रपटाचं नाव घेतलं नसलं तरीही त्यांचा रोख 'धुरंधर'कडेच आहे हे सर्वांना कळालं.
Web Summary : Pakistani singer Hasan Jahangir earned ₹45 lakhs for his song 'Hawa Hawa' being featured in 'Dhurandar 2'. He prioritized the song's popularity over the money, happy that a new generation is enjoying it.
Web Summary : 'धुरंधर 2' में 'हवा हवा' गाने के इस्तेमाल के लिए पाकिस्तानी गायक हसन जहांगीर को 45 लाख रुपये मिले। उन्होंने पैसे से ज्यादा गाने की लोकप्रियता को महत्व दिया और नई पीढ़ी द्वारा इसे पसंद किए जाने पर खुशी जताई।