Mika Singh : मिका सिंग हा बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक आहे. आपल्या आवाजाच्या बळावर त्याने कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे. मस्तमौला अंदाज, हटके आवाज आणि कायम वादामध्ये अडकलेला गायक म्हणून मीकानं त्याची ओळख निर्माण केली आहे. मिकाचे फक्त भारतामध्ये नाही तर जगभरात फॅन आहेत. अशाच एका पाकिस्तानी चाहत्यानेमिका सिंगला कोट्यवधींच्या भेटवस्तू दिल्या आहेत.
मिका सिंग सध्या अमेरिकेत कॉन्सर्ट करतोय. अमेरिकेतील बिलोक्सीतील कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी चाहत्याने स्टेजवर येऊन मिका सिंगला पांढऱ्या सोन्याची साखळी, हिऱ्याची अंगठी आणि रोलेक्स घड्याळ दिले. या सर्व भेटवस्तूंची किंमत तब्बल तीन कोटी रुपये आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक या चाहत्याचे कौतुक करताना थकत नाहीयेत.
मिका सिंगनं बॉलिवूडबरोबर पंजाबी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत. 'ऑंख मारे', 'राणी तू में राजा', 'आज की पार्टी' मिका सिंगची गाजलेली गाणी आजही पार्टी आणि कार्यक्रमांत वाजतात. मीका याचा जन्म पश्चिम बंगालमधील दुर्गापूर इथं झाला. तो पंजाबी सिनेमातील प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी याचा भाऊ आहे. मीकानं त्याच्या करीअरची सुरुवात गिटारिस्ट म्हणून केली होती. मीका सिंग याचं खरं नाव अमरीक सिंग आहे. आपल्या आवाजाच्या बळावर त्याने कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे.