व्हिजा संकटापासून पाकिस्तानी कलाकारदेखील झाले शिकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 00:33 IST
अनुपम खेरला पाकिस्तान जाण्यासाठी व्हिजा न देण्यावरून वादाचा दुसरा मुद्दा देखील आहे. असे नाहीच आहे की, फक्त पाकिस्तानतर्फे भारतीय ...
व्हिजा संकटापासून पाकिस्तानी कलाकारदेखील झाले शिकार
अनुपम खेरला पाकिस्तान जाण्यासाठी व्हिजा न देण्यावरून वादाचा दुसरा मुद्दा देखील आहे. असे नाहीच आहे की, फक्त पाकिस्तानतर्फे भारतीय कलाकारांना व्हिजा देण्याची मनाई केली जात असेल. बॉलिवूड मध्ये पाकिस्तानहून आलेले कलाकार आणि गायकांना खूप काम मिळत असेल, मात्र या गोष्टीला टाळू नाही शकत की, तेथील मनोरंजन आणि आणि संगीतशी जुडलेली तमाम असे दिग्गजदेखील आहेत, ज्यांना भारत येण्यासाठी व्हिजा नाकारण्यात आला आहे.बिपाशा बासू सोबत सुपर नेचुरल चित्रपट ‘सी थ्रीडी ’ मध्ये काम केलेले पाकिस्तानी नायक इमरान अब्बासच्या व्हिजा वरुन अडचणी निर्माण झाल्या होत्या, जेव्हा त्यांना व्हिजा मिळाला नव्हता आणि चित्रपटाची शूटिंग थांबली होती. नंतर कशीतरी शूटिंग पूर्ण झाली होती. मात्र चित्रपट प्रदर्शनच्यावेळी इमरान अब्बासला भारत येण्यासाठी व्हिजा नाही मिळाला.शाहरुख खानसोबत चित्रपट ‘रईस’ मध्ये काम करणारी पाकिस्तानी नायिका माहिरा खानचा पाकिस्तानी चित्रपट ‘बिन रोए’ ला जेव्हा भारतात प्रदर्शित केला गेला, तर शिवसेनाने त्यांना मुंबई येण्यावरून विरोध केला आणि त्यांना व्हिजा नाकारण्यात आला. याचप्रकारे इमरान हाश्मी सोबत ‘राजा नटवरलाल’ चित्रपटात काम करणारी अजून एक पाकिस्तानी नायिका हुमायूं मल्लिक (जिचा ‘बोल’ चित्रपट फारच आवडला होता) ला देखील व्हिजा नाही मिळाला आणि ते याच कारणाने चित्रपटाच्या प्रदर्शनात सहभागी होऊ शकली नव्हती. अली जाफर जेव्हा यशराजचा ‘मेरे भाई की दुल्हन’ चित्रपटात काम करीत होते, तर दोनदा चित्रपटाची शूटिंग रद्द करण्यात आली होती, कारण त्यांना व्हिजा मिळाला नव्हता. सोनम सोबत ‘खूबसूरत’ मध्ये काम करणारे पाकिस्तानी कलाकार फवाहद खान सोबतचा करण जौहरचा चित्रपट ‘कपूर एंड संस’ ची शूटिंग लंडन मध्ये केली गेली, कारण येथे त्यांचे व्हिजाचे प्रकरण सुटत नव्हते.