Join us
Daily Top 2Weekly Top 5

सध्या काय करतेय, राज कपूरची ही ‘हिना’? अचानक कुठे झाली गायब?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 11:45 IST

आज आम्ही तुम्हाला पाकिस्तानच्या एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये धूम केली होती.

ठळक मुद्देअसे म्हणतात की, जेबाचे सौंदर्य पाहून राज कपूर इतके प्रभावित झाले होते की, त्यांनी लगेच तिला ‘हिना’ची आॅफर दिली.

वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख जवळ येतेय, तसे देशात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतेय. बॉलिवूडही याला अपवाद नाही. पण आज आम्ही तुम्हाला पाकिस्तानच्या एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत.  या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये धूम केली होती. या अभिनेत्रीचे नाव होते जेबा बख्तियार.

जेबाही राज कपूर यांनी शोधलेली हिरोईन होती. ‘हिना’ या गाजलेल्या चित्रपटातून जेबाचा बॉलिवूड डेब्यू झाला होता. ‘हिना’ हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला. पण या चित्रपटानंतर जेबा अचानक गायब झाली. यानंतर बॉलिवूडच्या काही चित्रपटात दिसली. पण या चित्रपटाला यश मिळू शकले नाही. यानंतर जेबाला बॉलिवूडमध्ये काम मिळणे बंद झाले आणि  जेबा बॉलिवूडमधून अचानक गायब झाली, सध्या काय करतेय, हीच आजची स्टोरी आहे.

असे म्हणतात की, जेबाचे सौंदर्य पाहून राज कपूर इतके प्रभावित झाले होते की, त्यांनी लगेच तिला ‘हिना’ची आॅफर दिली. १९९१ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला. जेबासोबत ऋषी कपूर आणि अश्विनी भावे या चित्रपटात दिसले. पण जेबाच्या अभिनयापुढे सगळेच फिके पडले. या चित्रपटात जेबाने ‘हिना’ नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. ‘मैं हू खुशरंग हिना’ हे या चित्रपटाचे गाणे तुफान लोकप्रिय झाले होते. 

बॉलिवूडमध्ये काम मिळणे बंद झाल्यावर जेबाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. पुढच्या आयुष्यात जेबाने एक नाही, दोन नाही तर चार लग्न केलीत. जेबाने सलमान वालियानीसोबत पहिले लग्न केले. त्यांना एक मुलगीही झाली. पण हे लग्न फार काळ टिकले नाही. यानंतर जेबाने सिंगर अदनान सामीसोबत लग्न केले. अदनान व जेबा यांना एक मुलगा झाला. पण जेबाचे हे दुसरे लग्नही केवळ दोन वर्षे टिकले. १९९७ मध्ये दोघे विभक्त झालेत.

यानंतर जेबाने अभिनेता जावेद जाफरीसोबत लग्न केले. अर्थात जेबाने या लग्नाचा इन्कार केला. पण जावेदने ‘निकाहनामा’ दाखवल्यावर खरे ते सगळे जगासमोर आले. बॉलिवूडमधील करिअर संपल्यानंतर जेबा पाकिस्तानला परतली होती. येथे तिने सोहेल खान लेगारीसोबत चौथे लग्न केले. सोहेल कोण, याबद्दल फार माहिती नाही. सध्या जेबा पाकिस्तानात मालिका दिग्दर्शित करतेय.

टॅग्स :राज कपूरऋषी कपूरपाकिस्तानअदनान सामी