Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूड अभिनेत्रीने कापले लांबसडक केस, बदललेला लूक पाहून चाहत्यांना बसला धक्का, साकारलेली श्रीदेवीच्या लेकीची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 15:35 IST

अभिनेत्रीने नवीन हेअरकट केला आहे. लांबसडक केस कापून अगदी छोटे केल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे. सजलचा बॉब कट पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री सजल अलीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सजल अलीने तिचा लूक पूर्णपणे बदलला आहे. अभिनेत्रीने नवीन हेअरकट केला आहे. लांबसडक केस कापून अगदी छोटे केल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे. सजलचा बॉब कट पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. तिच्या या नव्या लूकने चाहत्यांना धक्का बसला आहे. 

सजल अलीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन तिच्या या नव्या लूकचा फोटो शेअर केला आहे. 11:11 Hi! असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या बहिणीलाही टॅग केलं आहे. अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी हा नवा हेअरकट तिच्या भूमिकेसाठी असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी हा पब्लिसिटी स्टंट असल्याचंही कमेंटमध्ये म्हटलं आहे. अनेकांनी सजलने केस कापले नसून हेअर विग लावल्याची कमेंट केली आहे. 

सजल अलीने 'मॉम' या बॉलिवूड सिनेमात श्रीदेवीच्या ऑनस्क्रीन मुलीची भूमिका साकारली होती. ती कायमच तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. २०२० मध्ये तिने अहाद रजा मीरसोबत लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर २ वर्षांनीच घटस्फोट घेत ते वेगळे झाले. सजल अभिनेता हमजा सोहेलला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. ते दोघे लग्नही करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण, या अफवा असल्याचं सजल अलीने म्हटलं होतं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sajal Ali's drastic haircut shocks fans; played Sridevi's daughter.

Web Summary : Pakistani actress Sajal Ali's new bob haircut surprises fans. She shared the look on Instagram, sparking debate about whether it's for a role or a publicity stunt. Ali, known for playing Sridevi's daughter in 'Mom,' was previously married to Ahad Raza Mir.
टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटी