Join us

आलिया भटवर भडकली पाकिस्तानी अभिनेत्री, केला हा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 18:40 IST

आलिया भटच्या पराडा साँग या गाण्यावरून आता एक वाद निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमेहविशने तिच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ही खूपच विचित्र गोष्ट आहे. बॉलिवूडमधील मंडळी नेहमीच पाकिस्तानला या ना त्या गोष्टीवरून ऐकवत असतात, पाकिस्तानचा तिरस्कार करतात तर दुसरीकडे ते आमचेच गाणे चोरत आहेत. 

आलिया भट ही खूप चांगली अभिनेत्री असण्यासोबतच ती एक खूप चांगली गायिका देखील आहे. तिने ही गोष्ट अनेकवेळा सिद्ध देखील केली आहे. आजवर अनेकवेळा तिने तिचे गाणे पुरस्कार सोहळ्यात अथवा एखाद्या समारंभात सादर केले आहे. आलियाचा नुकताच पराडा साँग व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या व्हिडिओद्वारे तिने म्युजिक व्हिडिओ क्षेत्रात पदार्पण केले आहे.

आलिया भटच्या पराडा साँग या गाण्यावरून आता एक वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश ह्यात या गाण्यावरून आलियावर प्रचंड भडकली आहे. मेहविशचे हे गाणे असून आलियाने हे गाणे चोरले असल्याचा तिच्यावर आरोप करण्यात आला आहे. मेहविशच्या वाइटल साइन या अल्बममधील 'गोरे रंग का जमाना...' हे गाणे आणि आलियाच्या पराडा साँग या गाण्यात साम्य असल्याचे या गायिकेचे म्हणणे आहे. या गाण्यात काही साम्य असल्याची सुरुवातीला सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. आता मेहविशने ट्वीट करत आलियावर आरोप लावला आहे.

 

मेहविशने तिच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ही खूपच विचित्र गोष्ट आहे. बॉलिवूडमधील मंडळी नेहमीच पाकिस्तानला या ना त्या गोष्टीवरून ऐकवत असतात, पाकिस्तानचा तिरस्कार करतात तर दुसरीकडे ते आमचेच गाणे चोरत आहेत. 

टॅग्स :आलिया भटपाकिस्तान