Dhurandhar Movie Pakistan Flag: आजच्या घडीला बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh ) याचे फॅन फॉलोइंग मोठे आहे. तो एक लोकप्रिय आभिनेता आहे. सध्य रणवीर हा त्याच्या 'धुरंधर' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'धुरंधर'च्या टीझरमध्ये रणवीर सिंग हा लांब केस, वाढलेली दाढी अशा लूकमध्ये आहे. अशातच 'धुरंधर' (Dhurandhar) या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी झेंडा फडकताना दिसत आहे. यामुळेच नेटकरी चांगलेच संतप्त झाले आहेत.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर लोक पाकिस्तानशी संबंधित प्रत्येक गोष्टींवरही बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अभिनेता दिलजीत दोसांझने 'सरदार जी ३' चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरला घेतल्यानंतर त्याचा विरोध झाला होता. त्यानंतर आता रणवीर सिंगच्या 'धुरंधर' चित्रपटाच्या सेटवर पाकिस्तानी झेंडा दिसल्याने नेटकरी भडकले आहेत. रणवीरच्या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात पाकिस्तानचा झेंडा दिसतोय. हे शुटिंग लुधियानामधील एका गावामध्ये झालं आहे.
दरम्यान, या व्हिडीओवरुन नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. काही जण म्हणतात की, "जर हे चित्रपटासाठी असेल, तर ठीक आहे". तर काही युजर्स मात्र रणवीरवर टीका करत म्हणालेत, "पाकिस्तानचा झेंडा का? याला परवानगी कोणी दिली? लज्जास्पद!".
सत्य घटनेवर आधारित चित्रपट? 'धुरंधर' हा एक सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. यात रणवीर भारतीय गुप्तहेर म्हणून पाकिस्तानात गुप्त मिशनवर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच, पाकिस्तानचा झेंडा ही दृश्याच्या गरजेनुसार वापरलेली गोष्ट आहे. या चित्रपटात भारतीय सैन्याचं शौर्य, त्याग आणि मिशनवर आधारित अनेक गोष्टी दाखवण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. 'धुरंधर' चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन 'उरी' फेम आदित्य धर करत आहेत. रणवीरसह, या चित्रपटात आर माधवन, संजय दत्त, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल यांसारखे दमदार कलाकार आहेत. विशेष म्हणजे तमिळ अभिनेत्री सारा अर्जुन या चित्रपटात रणवीरसोबत दिसतेय. 'धुरंधर' चित्रपट डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.