Join us
Daily Top 2Weekly Top 5

हा पाकिस्तानी क्रिकेटपटू सोनाली बेंद्रेच्या प्रेमात झाला होता वेडा! किडनॅप करण्याचीही होती तयारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 14:56 IST

होय, पाकिस्तानचा एक माजी गोलंदाज एकेकाळी बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेसाठी अक्षरश: वेडा झाला होता. सोनालीचा फोटो सतत त्याच्या वॉलेटमध्ये असायचा.

ठळक मुद्दे शोएबने ‘अंग्रेजी बाबू देसी मेम’ या चित्रपटात सोनालीला पहिल्यांदा पाहिले होते आणि तिला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला होता.

वर्ल्ड कप 2019 च्या भारत-पाक क्रिकेट सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर त्याच्या युट्यूब चॅनलवर व्हिडीओ शेअर करण्याचा सपाटा लावला आहे. पण ही बातमी शोएबच्या व्हिडीओबद्दल नाही तर त्याच्या पूर्वायुष्याबद्दल आहे. होय, पाकिस्तानचा हा माजी गोलंदाज एकेकाळी बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेसाठी अक्षरश: वेडा झाला होता. सोनालीचा फोटो सतत त्याच्या वॉलेटमध्ये असायचा. इतकेच नाही तर सोनालीला किडनॅप करण्याचीही त्याची तयारी होती. आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे.  एका चॅट शोमध्ये खुद्द शोएबने हा खुलासा केला होता.

 माझ्या खोलीत सगळीकडे सोनालीचे पोस्टर्स आहेत. सोनालीने माझे प्रपोजल नाकारले तर मी तिला किडनॅप करेल, असेही तो म्हणाला होता. शोएबने ‘अंग्रेजी बाबू देसी मेम’ या चित्रपटात सोनालीला पहिल्यांदा पाहिले होते आणि तिला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला होता.

एकदा सोनाली बेंद्रेला शोएबच्या या प्रेमाबद्दल विचारण्यात आले होते. यावर मी शोएब अख्तर या नावाच्या कुठल्याही पाकिस्तानी क्रिकेटपटूला ओळखत नाही. मी त्याची फॅन नाही. पण हो, तो माझा फॅन असल्याचे मी ऐकले आहे. जेव्हा केव्हा भारत-पाक क्रिकेट सामना होतो, तेव्हा मीडिया मला त्याच्याबद्दल फोन करून विचारायला लागतो, मला हे सगळे हास्यास्पद वाटते, असे ती म्हणाली होती.

तूर्तास वर्ल्ड कप 2019 मध्ये भारत-पाकिस्तान सामना सुरु झाला आहे. आजच्या सामन्याचे वातावरणं आता तापू लागले आहे.  पाकिस्तानने नाणेफेक जिंकली असून भारत प्रथम फलंदाजी करणार आहे.

टॅग्स :सोनाली बेंद्रेभारत विरुद्ध पाकिस्तान