Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘हिंदी मीडियम’ची अभिनेत्री सबा कमरविरोधात अटक वॉरंट, जाणून घ्या काय आहे भानगड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 11:11 IST

दिवंगत अभिनेता इरफान खान याच्या ‘हिंदी मीडियम’ या सिनेमात सबा कमर दिसली होती.

ठळक मुद्देसबा कमर व काही अन्य लोकांविरूद्ध पाकिस्तानच्या एका ऐतिहासिक मशिदीत नाचगाण्याचा व्हिडीओ शूट केल्याच्या आरोपात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘हिंदी मीडियम’ या चित्रपटातील पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर हिच्यावर सध्या अटकेची तलवार आहे. पाकिस्तानच्या एका स्थानिक न्यायालयाने तिच्याविरूद्ध अटक वॉरंट जारी केला आहे.पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, सबा कमरसोबत पाकिस्तानी गायक बिलाल सईद याच्याविरूद्धही लाहोर मॅजिस्ट्रेट न्यायालयाने अटक वॉरंट जारी केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणीसाठी 6 ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.दिवंगत अभिनेता इरफान खान याच्या ‘हिंदी मीडियम’ या सिनेमात सबा कमर दिसली होती. या चित्रपटातील तिच्या भुमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. चित्रपटही   हिट झाला होता.

 काय आहे प्रकरणसबा कमर व काहीअन्य लोकांविरूद्ध पाकिस्तानच्या एका ऐतिहासिक मशिदीत नाचगाण्याचा व्हिडीओ शूट केल्याच्या आरोपात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरण 2020 चे आहे. लाहोर पोलिसांनी कथितरित्या मशीद अपवित्र केल्याच्या आरोपाखाली सबा कमर व बिलाल सईदविरोधात गुन्हा दाखल केला होता. सबा व बिलाल यांनी आपल्या एका डान्स व्हिडीओसाठी मशीदचे पावित्र्य भंग केले, असा आरोप आहे. यामुळे लोकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याप्रकरणी दोन वरिष्ठ अधिका-यांवर बडतर्फीची कारवाईही केली होती. या प्रकरणानंतर सबा व बिलालने लोकांची जाहिर माफीही मागितली होती.

टॅग्स :इरफान खान