पाकी अभिनेता फवादला कन्यारत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2016 10:51 IST
पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याच्या मागणीवरून सुरु असलेल्या वादादरम्यान पाकी अभिनेता फवाद खान याला एक गोड बातमी मिळाली आहे. फवादला ...
पाकी अभिनेता फवादला कन्यारत्न
पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याच्या मागणीवरून सुरु असलेल्या वादादरम्यान पाकी अभिनेता फवाद खान याला एक गोड बातमी मिळाली आहे. फवादला कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. फवादची पत्नी सदफ खान हिने मंगळवारी मुलीला जन्म दिला. फवाद व सदफ यांचे हे दुसरे मुल आहे. दोघांनाही आधीचा एक मुलगा असून त्याचे नाव अयान आहे. २००५ मध्ये फवाद लग्नगाठीत अडकला होता.