Join us

"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 17:20 IST

मोदी सरकारच्या निर्णयानंतर प्रियकर सचिनसाठी पाकिस्तान सोडून भारतात आलेली सीमा हैदर पुन्हा परतणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आता राखी सावंतने विनंती करत सीमा हैदरला पाकिस्तानात न पाठवण्याची विनंती केली आहे. 

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली. दहशतवाद्यांनी अत्यंत क्रूरपणे २६ जणांची हत्या केली. यानंतर भारत सरकारने कायदेशीर कारवाई करत पाकिस्तानची कोंडी केली. भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर प्रियकर सचिनसाठी पाकिस्तान सोडून भारतात आलेली सीमा हैदर पुन्हा परतणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आता राखी सावंतने विनंती करत सीमा हैदरला पाकिस्तानात न पाठवण्याची विनंती केली आहे. 

राखीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती म्हणते, "सीमा हैदरला पाकिस्तानात परत पाठवू नका. कारण, ती आता भारताची सून आहे. ती सचिनची पत्नी आहे आणि त्याच्या मुलाची आई आहे. त्यामुळे तिला पाकिस्तानात परत पाठवलं नाही पाहिजे. ती सचिनवर प्रेम करते. ती हिंदू झाली आहे. एका महिलेवर अन्याय नाही केला पाहिजे. ती सचिनच्या मुलाची आई नसती तर तुम्ही तिला पाठवू शकत होतात. पण, आता तुम्ही तिला परत पाठवू शकत नाही. तिच्यासोबत तुम्ही चुकीचा व्यवहार करू शकत नाही. तिला भारतातून हकलून देऊ नका. तिच्यावर अन्याय करू नका". 

"षडयंत्र कोण करतंय, या गोष्टी आम्हाला नाही माहीत. ते देवालाच माहीत आहे. पण, यात चूक नसलेल्या लोकांसोबत वाईट नाही घडलं पाहिजे. सीमा हैदर पाकिस्तानी आहे हे मला माहित आहे. पण, ती आज भारताची सून आहे. सचिनशी लग्न करून तिने मुस्लीम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला आहे. ती हिंदुस्तानचा जयघोष करते. त्यामुळे या देशातून त्या देशात, त्या देशातून या देशात असं करू नका. ती एक महिला आहे कोणता फुटबॉल नाही. त्यामुळे मी विनंती करू इच्छिते की तिला भारतातून हकलून देऊ नका", असंही राखीने म्हटलं आहे. 

नोएडामध्ये राहणाऱ्या सचिन मीनाशी याच्यासोबत लग्न करण्यासाठी २०२३ मध्ये सीमा हैदर आपल्या मुलांसह पाकिस्तानहून पळून भारतात आली होती. त्यानंतर सीमा हैदर आणि सचिन यांनी लग्न केलं. त्यांना एक मुलगीदेखील आहे. सीमाने मोदी सरकार आणि योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहित भारतात तिच्या नवीन कुटुंबासोबत राहू देण्याची विनंती केली आहे. 

टॅग्स :राखी सावंतपहलगाम दहशतवादी हल्ला