Join us
Daily Top 2Weekly Top 5

ही बनणार पद्मिनी कोल्हापुरेची सुनबाई, मुलगा प्रियांकने केला साखरपुडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 10:29 IST

प्रियांकने नुकताच बॉलिवूड डेब्यू केला होता. ‘सब कुशल मंगल’ या सिनेमात तो दिसला होता.

ठळक मुद्देशजाबद्दल सांगायचे तर ती असिस्टंट डायरेक्टर आहे.

2020 या वर्षाने काही कटू आठवणी दिल्यात. सोबत काही गोड आठवणीही. बॉलिवूड आणि टीव्हीचे अनेक सेलिब्रिटींनी या वर्षांत लग्नगाठ बांधली. नेहा कक्कर, आदित्य नारायण, पुनीत पाठक, क्रिकेटपटू युजवेंद्र चहल अशा सगळ्यांचे शाही विवाह सोहळे या वर्षात पार पडले. लवकरच गौहर खान लग्नबंधनात अडकणार आहे. आता एकेकाळची गाजलेली अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियांक शर्मा हाही बोहल्यावर चढण्यास सज्ज आहे. प्रियांकने निर्माता करीम मोरानीची मुलगी शजा मोरानी हिच्यासोबत साखरपुडा केला आहे. हे कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

प्रियांक शर्मा हा अभिनेत्री श्रद्धा कपूरचा मावसभाऊ आहे. श्रद्धाचा भाऊ सिद्धांतने प्रियांकच्या साखरपुड्याचा फोटो शेअर करत, दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘जगातील माझ्या सर्वात आवडत्या दोन व्यक्ति लग्नबंधनात अडकणार आहेत. मी खूप आनंदी आहे,’ असे सिद्धांतने लिहिले आहे.

प्रियांकचा साखरपुडा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. येत्या जानेवारी वा फेब्रुवारी महिन्यात हे कपल लग्न करणार, असे मानले जात आहे. प्रियांकने नुकताच बॉलिवूड डेब्यू केला होता. ‘सब कुशल मंगल’ या सिनेमात तो दिसला होता.

शजाबद्दल सांगायचे तर ती असिस्टंट डायरेक्टर आहे. ऑलवेज कभी कभी, हॅपी न्यू इअर यासारख्या सिनेमात तिने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले होते.यावर्षी सुरुवातीला शजा, तिची बहीण जोआ आणि वडील करीम मोरानी यांना कोरोना झाला होता. त्यांना अनेक दिवस रूग्णालयात राहावे लागले होते.

टॅग्स :पद्मिनी कोल्हापुरे