Join us

सिनेमाच्या सेटवर निर्मात्याच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळून जाऊन केलं पद्मिनी कोल्हापुरेंनी लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 08:37 IST

पद्मिनी कोल्हापुरे यांनी वयाच्या १५ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ऐसा प्यार कहाँ या सिनेमाने त्यांचं नशीब पालटलं.

पद्मिनी कोल्हापुरे... हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावणारी मराठमोळी अभिनेत्री. आज पद्मिनी यांचा वाढदिवस. प्रेम रोग, आहिस्ता आहिस्ता, वो सात दिन, विधाता अशा विविध सिनेमातील दमदार भूमिकांनी पद्मिनी कोल्हापुरे यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. 80 दशकात त्यांची वेगळीच जादू होती. 

 त्यांचा जन्म मुंबईत 1 नोव्हेंबर 1965 रोजी झाला.  पद्मिनी यांना ,खरे तर आत्या लता मंगेशकर व आशा भोसले यांच्यासारखे गायिका बनायचे होते. गायिका बनण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. यादरम्यान केवळ नशीब आजमावण्यासाठी त्या सिनेमात आल्या आणि नंतर सिनेमा आणि अभिनय हेच त्यांचे आयुष्य बनले. पद्मिनी कोल्हापुरे यांनी वयाच्या १५ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ऐसा प्यार कहाँ या सिनेमाने त्यांचं नशीब पालटलं. या सिनेमानंतर त्यांच्या फिल्मी करिअरसोबतच पर्सनल आयुष्यातही अनेक मोठे बदल घडले. या सिनेमाचे निर्माचे प्रदीप शर्मा यांच्या प्रेमात पद्मिनी पडली आणि त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली. 

ऐसा प्यार कहाँ या सिनेमाच्या सेटवर पद्मिनी आणि प्रदीप यांची पहिली भेट झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. वयाच्या २१ व्या वर्षी पद्मिनी यांनी प्रदीपसोबत लग्न करायचा निर्णय घेतला. परंतु, घरातून परवानगी मिळणार नाही या भीतीने त्या घरातून पळून आल्या आणि १४ ऑगस्ट १९८६ मध्ये त्यांनी प्रदीप शर्मासोबत लग्न केलं. 

टॅग्स :पद्मिनी कोल्हापुरे