Join us

​‘पद्मावती’ची शू्टिंग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2016 15:11 IST

संजय लीला भंसाळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ चित्रपटाची एक नोव्हेंबरपासून शूटींग सुरू झाली. रणवीर सिंग, दीपिका आणि शाहिद कपूर अभिनित या ...

संजय लीला भंसाळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ चित्रपटाची एक नोव्हेंबरपासून शूटींग सुरू झाली. रणवीर सिंग, दीपिका आणि शाहिद कपूर अभिनित या चित्रपटाची बऱ्याच काळापासून खूप चर्चा सुरू आहे. धुमधडाक्यात दिवाळी साजरी केल्यानंतर सर्व कलाकारांनी चित्रिकरणास प्रारंभ केला आहे.या ऐतिहासिक प्रेमकहाणीमध्ये दीपिका राणी पद्मावतीच्या भूमिकेत असून शाहिद कपूर राजा रतन सिंगची भूमिका साकारत आहे. भंसाळीचा फेव्हरेट रणवीर मुघल सुल्तान अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘राम-लीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’नंतर भंसाळी-दीपिका-रणवीर हे त्रिकुट या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येत आहे.सध्या सोशल मीडियावर चित्रपटाच्या क्लॅपबोर्डचा फोटो फिरत असून त्यानुसार सुदीप चटर्जी कॅमेरामन आहेत. ऐतिहासिक गोष्टी रुपेरी पडद्यावर यशस्वीपणे साकारण्यात भंसाळीचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे.                                  मध्यंतरी दीपिका आणि शाहिदमध्ये वाढणाऱ्या सलगीमुळे रणवीर नाराज असून त्यामुळे दीपिकासोबतच्या नात्याला तडा गेल्याचे कळतेय. पुढील वर्षाच्या शेवटी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.