गेल्या २५ जानेवारीला रिलीज झालेल्या ‘पद्मावत’ने पेड प्रिव्ह्यूमध्येच पाच कोटी रुपये कमावले होते, तर रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी १९ कोटी, शुक्रवारी ३२ कोटी, शनिवारी २७ कोटी, रविवारी ३१ कोटी, सोमवारी १५ कोटी, मंगळवारी १४ कोटी, बुधवारी १२ कोटी अशाप्रकारे चित्रपटाने आतापर्यंत कमाई केली आहे.#Padmaavat 1st Week WW BO:#India :Nett - ₹ 155 CrsGross - ₹ 201.50 CrsOverseas:Gross - ₹ 106.50 Crs [US $16.75 M]Total - ₹ 308 Crs #Excellent@deepikapadukone@RanveerOfficial@shahidkapoor— Ramesh Bala (@rameshlaus) February 1, 2018
Padmaavat Box Office Collection : ‘पद्मावत’ची आतापर्यंतची कमाई जाणून तुम्हाला धक्का बसेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 17:02 IST
प्रचंड वादानंतरही ‘पद्मावत’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर जबरदस्त कमाई करताना दिसत आहे. वास्तविक हा चित्रपट देशातील चार प्रमुख राज्यांमध्ये ...
Padmaavat Box Office Collection : ‘पद्मावत’ची आतापर्यंतची कमाई जाणून तुम्हाला धक्का बसेल!
प्रचंड वादानंतरही ‘पद्मावत’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर जबरदस्त कमाई करताना दिसत आहे. वास्तविक हा चित्रपट देशातील चार प्रमुख राज्यांमध्ये प्रदर्शित होऊ दिला नाही, मात्र अशातही चित्रपटाच्या कमाईचे आकडे डोळे दिपवणारे आहेत. केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही चित्रपट झटपट कमाई करताना दिसत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने वर्ल्डवाइड ग्रॉस कलेक्शन ३०० कोटींपेक्षा अधिक केले आहे, तर देशांतर्गत आतापर्यंतची कमाई १५५ कोटी इतकी आहे. ट्रेड एनलिस्ट रमेश बालाच्या मते, गेल्या गुरुवारी चित्रपटाने जवळपास १.५ कोटी रुपयांची कमाई केली. मात्र विदेशात चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळत असल्याने तेथील आकडे अधिक आहेत. उत्तर अमेरिका, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलॅण्ड या देशांमध्ये चित्रपट बंपर कमाई करीत आहे. एका आठवड्यातच चित्रपटाने ओवरसीज मार्केटमध्ये जवळपास १०६ कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे वल्डवाइड ग्रॉस कलेक्शनचे आकडे ३०८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.