पाकी अभिनेत्री माहिरा खानबरोबरच्या रणबीर कपूरच्या ‘त्या’ फोटोंवर पप्पा ऋषी कपूरने दिली खळबळजनक प्रतिक्रिया!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 20:05 IST
आज सकाळीच आम्ही तुम्हाला रणबीर कपूर आणि माहिरा खान यांचे व्हायरल होत असलेले फोटो दाखविले. असे म्हटले जात आहे ...
पाकी अभिनेत्री माहिरा खानबरोबरच्या रणबीर कपूरच्या ‘त्या’ फोटोंवर पप्पा ऋषी कपूरने दिली खळबळजनक प्रतिक्रिया!
आज सकाळीच आम्ही तुम्हाला रणबीर कपूर आणि माहिरा खान यांचे व्हायरल होत असलेले फोटो दाखविले. असे म्हटले जात आहे की, हे फोटो जुलै किंवा आॅगस्ट महिन्यातील असावेत. याचा अर्थ रणबीर आणि माहिरा बºयाच काळापासून एकमेकांना डेट करीत असावेत. हे फोटो सोशल मीडियावर येताच लोकांनी त्यास वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. मात्र पप्पा ऋषी कपूरने यावर प्रतिक्रिया दिली नसल्याने सगळ्यांनाच त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यास उत्सुकता लागली होती. कारण त्यांचा लाडका का करीत आहे, हे त्यांना तरी माहीत आहे काय? असा सूर नेटकºयांमध्ये व्यक्त केला जात होता. आता ऋषी कपूर यांनी यावर प्रतिक्रिया दिल्याने नेटकºयांची आतुरता काहीसी कमी झाली असे म्हणावे लागेल. काही वेळापूर्वीच हिन्दुस्तान टाइम्सशी चर्चा करताना ऋषी यांनी यासर्व प्रकरणावर अतिशय खळबळजनक अशी प्रतिक्रिया दिली. ऋषी कपूरने म्हटले की, ‘मीदेखील हे फोटो आज सकाळीच बघितले. माझ्यासाठी या फोटोंचा काहीही अर्थ नाही. त्यामुळे तुम्ही मला यासर्व प्रकरणापासून दूर ठेवा. तुम्ही त्याला प्रश्न विचारायला हवेत, जो या फोटोंमध्ये दिसत आहे. मीदेखील हे फोटो ट्विटरवरच बघितले आहेत. कारण मी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर नाही. असे नाही की, मी हे फोटो अगोदरच बघितले आहेत अन् आता न बघितल्याचे नाटक करीत आहे. खरं तर तुम्हालाच हे कळायला हवे की, रणबीर एक नवा स्टार आहे. त्याचे लग्न अजून झालेले नाही. त्यामुळे त्याला वाटेल त्या मुलीला तो भेटू शकतो. त्यामुळे जी मंडळी त्याच्या प्रायव्हेट लाइफमध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत आहेत, ते चुकीचे आहे. मी या प्रकरणावर याशिवाय दुसरे काहीही सांगू शकणार नाही. तो एक तरुण मुलगा आहे. अशात तो जर एखाद्या मुलीला भेटत असेल तर त्यात वाईट काय? जेव्हा ऋषी यांना रणबीर आणि माहिरा सिगरेट पिताना फोटोमध्ये दिसत आहेत यावर तुमचे काय म्हणणे आहे? असे विचारण्यात आले तेव्हा त्यांनी म्हटले की, ‘आपण स्वत:हूनच का बरं असा निष्कर्ष काढत आहोत की, या दोघांमध्ये काही तरी सुरू आहे? ते दोघे असेच भेटले असतील तर? असू शकते हे दोघे कोणत्यातरी रेस्टॉरंटमध्ये गेले असावेत, मात्र मध्ये स्मोक करणे अलाउड नसल्याने ते दोघे बाहेर येऊन स्मोक करीत असावे. यूएसमध्ये खूप कडक नियम आहेत. त्याठिकाणी पब्लिक प्लेसमध्ये स्मोकिंग करण्याची परवानगी नाही. याव्यतिरिक्त मी यावर काहीही बोलू इच्छित नाही. ते दोघे एकमेकांना डेट करीत आहेत की नाही, याविषयी मी काहीच सांगू शकत नाही. मुंबईतील लोकांनी हे फोटो बघितले आणि चर्चा करायला सुरुवात झाली. परंतु असेही असू शकते की, ही चर्चा पूर्णत: चुकीची असावी. असो, पप्पा ऋषीचे हे वक्तव्य म्हणजे आपल्या लाडक्याला क्लिन चिट देण्याचा प्रकार आहे. आता सर्वांनाच रणबीर भारतात परतण्याची प्रतीक्षा लागली आहे. कारण या फोटोंचे वास्तव रणबीरच सांगू शकेल.