Join us
Daily Top 2Weekly Top 5

 तिला शांती लाभू द्या...! सुशांतची एक्स-मॅनेजर दिशाचे कुटुंबीय अफवांमुळे त्रस्त, लिहिली भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 10:10 IST

दिशाच्या आत्महत्येबद्दल वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांनी दिशाच्या कुटुंबीयांना व्यथित केले आहे. इतके की, अखेर त्यांना याबद्दल स्पष्टीकरण द्यावे लागले.

ठळक मुद्देदिशा गेली, ती गेल्यानंतर आम्ही कुठल्या स्थितीतून जात आहोत, याच तुम्हाला कल्पना असावी. तेव्हा कृपा करून वाट्टेल त्या अफवा पसरवू नका, असे तिच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.

सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली, त्याच्या काही दिवस आधी त्याची एक्स-मॅनेजर दिशा सालियन हिने 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. सुशांतच्या मृत्यूप्रमाणेच दिशाच्याही मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण तूर्तास दिशाच्या आत्महत्येबद्दल वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांनी दिशाच्या कुटुंबीयांना व्यथित केले आहे. इतके की, अखेर त्यांना याबद्दल स्पष्टीकरण द्यावे लागले.

दिशा गेली, ती गेल्यानंतर आम्ही कुठल्या स्थितीतून जात आहोत, याच तुम्हाला कल्पना असावी. तेव्हा कृपा करून वाट्टेल त्या अफवा पसरवू नका, असे तिच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.‘ हे स्टेटमेंट जे कोणी हे वाचत असेल, तुम्ही कदाचित आम्हाला आणि दिशाला ओळखत नसाल. पण आपल्यात एक गोष्ट समान आहे ती म्हणजे आपण माणूस आहोत आणि आपण फिल करू शकतो. दिशाच्या जाण्याने आम्ही कोणत्या त्रासातून जात आहोत, हे तुम्ही समजू शकता. तिच्या मृत्यूच्या वेदना आम्ही सोसत आहोत. मात्र त्याहूनही अधिक त्रासदायक बाब म्हणजे दिशाबाबत अफवा आणि विविध कॉन्स्परसी. या सर्व अफवा, चर्चांचा परिणाम दिशाच्या कुटुंबीयांवर होत आहे. दिशा ही कुणाची मुलगी आहे, कुणाची बहीण आहे, कुणाची मैत्रिण आहे. तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तिच्या मृत्यूपश्चात अशा अफवा पसरवल्या जात असतील तर तुम्हाला काय वाटेल, याचा जरा विचार करा. अशा प्रकारच्या बातम्या शेअर न करता आणि त्यावर विश्वास न ठेवता दिशाच्या जाण्यामुळे झालेली जखम भरुन काढण्यास मदत करा. ती जिथे कुठे आहे, तिला शांती लाभू द्या’ असे दिशाच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.

काय आहे चर्चा सुशांतची एक्स मॅनेजर दिशा ही सूरजच्या मुलाची आई बनणार होती आणि 2017 मध्ये यावरून सुशांत व सूरज यांच्यात कथितरित्या वाद झाला होता. सूरजबद्दल सुशांतला ठाऊक होते आणि तो त्याचा पर्दाफाश करणार होता. या सगळ्या प्रकरणात सलमान खान सूरजला पाठीशी घालत होता, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. अर्थात सूरजने या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. कोणता वाद? मला तर दिशा कोण हेही ठाऊक नाही, असे त्याने स्पष्ट केले आहे.

 

 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत