Join us

सस्पेन्स, थ्रिलर, ॲक्शन! या विकेंडला घरबसल्या पाहा 'हे' नवे-कोरे चित्रपट आणि वेबसीरिज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 16:09 IST

या आठवड्यात ओटीटीवर एक-दोन नाही तर अनेक चित्रपट आणि सीरिज येत आहेत.

Ott Release This Week: यंदाचा ऑगस्ट महिना खूप सुट्ट्या घेऊन आला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या खास प्रसंगी एक मोठा ‘लाँग वीकेंड’ मिळणार आहे. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाची सुट्टी शुक्रवारी असल्याने, त्यानंतरचा शनिवार १६ ऑगस्टला जन्माष्टमी आहे. त्यानंतर१७ ऑगस्ट रोजी रविवार येतोय. अशी जोडून एक शानदार 'लाँग वीकेंड’ मिळणार आहे. म्हणजेच १५, १६ आणि १७ ऑगस्ट २०२५ हे सलग तीन दिवस सुट्टीचे असतील. अशा परिस्थितीत, चित्रपट आणि सीरिज प्रेमींसाठी हा आठवडा खास आसणार आहे. या आठवड्यात ओटीटीवर एक-दोन नाही तर अनेक चित्रपट आणि सीरिज येत आहेत.

जॉन अब्राहम स्टारर 'तेहरान' (Tehran) हा चित्रपट बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. हा चित्रपट आज म्हणजेच १४ ऑगस्ट रोजी OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर स्ट्रीम झाला आहे. या चित्रपटाची कथा इराण-इस्रायल हल्ल्यावर आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला देशभक्तीपर चित्रपट पहायला आवडत असतील, तर हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. 

यानंतर  प्रतीक गांधी आणि सनी हिंदुजा यांचा 'सारे जहाँ से अच्छा'  (Saare Jahan Se Accha) हा चित्रपट या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट भारतीय गुप्तहेर विष्णू शंकर आणि आयएसआय एजंट मुर्तझा मलिक यांच्याबद्दल आहे. हा चित्रपट १३ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झाला आहे.

जर तुम्हाला अ‍ॅक्शन आणि सस्पेन्स थ्रिलर पाहायला आवडत असेल तर 'अंधेरा' (Andhera ) ही सीरिज तुमच्यासाठीच आहे. अभिनेत्री प्रिया बापट, प्राजक्ता कोळी, सुरवीन चावला स्टारर सायकोलॉजिकल थ्रिलर असलेली 'अंधेरा' देखील ओटीटीवर आली आहे. प्रेक्षक ती प्राइम व्हिडीओवर पाहू शकतात.

कोर्टरूम ड्रामाचे जर तुम्ही चाहते असाल तर "कोर्ट कचहरी" ही सीरिज तुम्ही घरबसल्या पाहू शकता. ही सीरिज तुम्हाला सोनी लिव्हवर (SonyLIV) पाहता येईल. 

टॅग्स :सिनेमासेलिब्रिटीबॉलिवूडवेबसीरिजनेटफ्लिक्स