Oscars Awards 2026: मनोरंजन विश्वातील अतिशय प्रतिष्ठित आणि मानाचा मानला जाणारा ९८वा अकादमी पुरस्कार सोहळा आज अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा प्रेझेंटर म्हणून झळकली. प्रियांकाने पती निक जोनाससह ९८व्या अकादमी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. एकीकडे प्रियांका चोप्राने ऑस्करमध्ये भारतीयांची मान अभिमानाने उंचावली असताना दुसरीकडे मात्र चाहत्यांनी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
दरवर्षी अकादमी पुरस्कार सोहळ्यामध्ये वर्षभरातील दिवंगत कलाकारांना मेमोरियम सेगमेंटमध्ये श्रद्धांजली अर्पण केली जाते. यावर्षीही ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात गेल्या वर्षभरात निधन झालेल्या आणि सिनेसृष्टीत योगदान दिलेल्या कलाकारांना विशेष मानवंदना दिली गेली. जगभरातील दिवंगत कलाकारांना चित्रफितीच्या माधम्यातून अकादमी पुरस्कार सोहळ्यात वंदन करत त्यांना आदरांजली देण्यात आली. मात्र यात बॉलिवूडचे ही मॅन कुठेच दिसले नाहीत. बॉलिवूड आणि सिनेसृष्टीत इतकी दशकं काम करून, मोठं योगदान देऊनही त्यांना मनोरंजन विश्वातील मानाच्या पुरस्कार सोहळ्यात स्थान न मिळाल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. "हा इंटरनॅशनल नव्हे तर हॉलिवूडचा सोहळा आहे", असं म्हणत चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
२०२४च्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना आदरांजली देण्यात आली होती. त्याआधी बॉलिवूड अभिनेता इरफान खान आणि ऑस्कर विजेत्या लोकप्रिय वेशभूषाकार भानू अथय्या यांना २०२१च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती. दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी आणि शशी कपूर यांच्या योगदानाबद्दल २०१८ मध्ये ऑस्कर सोहळ्यात त्यांना मानवंदना दिली गेली होती. त्यामुळे यंदाच्या पुरस्कार सोहळ्यातही बॉलिवूडचे ही मॅन धर्मेंद्र यांना आदरांजली देण्यात येईल, अशी अपेक्षा चाहत्यांना होती. मात्र ऑस्कर धर्मेंद्र यांना विसरलं.
बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र यांचं २४ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झालं. वयाच्या ८९ व्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांनी गेली सहा दशकं बॉलिवूडवर राज्य केलं. त्यांची भूमिका असलेले 'शोले', 'दादागिरी', 'आग ही आग', 'जीने नही दुंगा', 'धर्म और कानून', 'बर्निंग ट्रेन' या सिनेमांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारले. धर्मेंद्र यांच्या तगड्या अॅक्शनमुळे त्यांना बॉलिवूडचे ही-मॅन म्हणून ओळखलं जातं. धर्मेंद्र यांचे अलीकडेच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि 'तेरी बातो में ऐसा उलझा जिया' हे दोन सुपरहिट सिनेमे रिलीज झाले. 'इक्कीस' हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला.
Web Summary : Dharmendra's absence from the Oscars' In Memoriam segment sparked outrage. Despite decades in Bollywood and recent films, he was overlooked, upsetting fans who expected tribute.
Web Summary : ऑस्कर के 'इन मेमोरियम' खंड में धर्मेंद्र की अनुपस्थिति से आक्रोश फैल गया। बॉलीवुड में दशकों और हालिया फिल्मों के बावजूद, उन्हें अनदेखा किया गया, जिससे प्रशंसक नाराज हो गए।